Hospital  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: ...तर गोव्यातील खाजगी रुग्णालयांची होणार चौकशी; आरोग्य खात्याचे नवे परिपत्रक

आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांना दिले निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government: गोवा सार्वजनिक आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांना कारवाईचा इशारा देणारे नवे परिपत्रक जारी केले आहे. रुग्णाला शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयांत पाठवणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नव्या परिपत्रकात आरोग्य विभागाने 'जादा शुल्क आकारून' हे शब्द काढून टाकले आहेत.

राज्यातील अनेक खासगी इस्पितळे रुग्णाला शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णालयांत ठेवून घेतात आणि रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालयाचा खर्च घेउन त्याला सरकारी रुग्णालयांत नेण्यास सांगतात असे प्रकार राज्यात उघडकीस येवू लागले आहेत.  कोविड काळात राज्यात असे प्रकार सातत्याने समोर आलेले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरुच असल्यामुळे सरकारने थेट कारवाईचा बडगा उचलला आहे.

नातेवाईकांकडून रुग्णालयाचा खर्च घेवून रुग्णाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह (गोमेकॉ) इतर सरकारी रुग्णालयात पाठवणाऱ्या खासगी रुग्णालयांची चौकशी करावी आणि असे प्रकारे करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी असे निर्देश आरोग्य खात्याने गोमेकॉचे डीन, आरोग्य संचालक, बांबोळीतील दंत महाविद्यालयाचे डीन, मानसोपचार आणि मानवीवर्तन संस्थेचे (आयपीएचबी) डीन यांना दिले आहेत. आरोग्य खात्याच्या अवर सचिव तृप्ती मणेरीकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.      

दरम्यान, आरोग्य खात्याने याबाबतचे सुधारित परिपत्रक पुन्हा जारी केले आहे. नव्या परिपत्रकात आरोग्य विभागाने 'जादा शुल्क आकारून' हे शब्द काढून टाकले आहेत. तसेच असे प्रकार करणाऱ्या रुग्णालयांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT