private Buses  Gomantak Digital Team
गोवा

Pernem Private Buses : खासगी बसेसच्या अनियमित फेऱ्या

केरी-पेडणे-म्हापसा मार्ग : राष्ट्रीयीकरणाच्या मागणीला जोर

गोमन्तक डिजिटल टीम

केरी व्हाया हरमल ते पेडणे व केरी ते म्हापसा मार्गावरील खासगी बसेस वारंवार अनियमित सेवा देत असल्याने प्रवाशांची बरीच गैरसोय होत आहे. याबाबत प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या दोन्ही मार्गांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी होत आहे.

गेले अनेक दिवस हा सिलसिला चालू आहे. सरकारी व खासगी कंपन्यांत जाणाऱ्या प्रवासीवर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो. पूर्वीकाळी अर्धा-एक तासात येणाऱ्या बसेस अलीकडे तास-दीड तासाने फेरी घेत असल्याने प्रवासीवर्गाचे हाल होत असल्याचे प्रवासी औदुंबर हरमलकर यांनी सांगितले. एरव्ही पेडणे मार्गावर सकाळी ७.१५ वा.च्या कदंब बसनंतर सकाळी ८.३० वाजता खासगी बसची फेरी असते. मात्र, सकाळी ९.३० वा.पर्यंत दुसरी बस आली नव्हती, असे हरमलकर यांनी सांगितला.

प्रवाशांची उडते धांदल

गेले कित्येक महिने खासगी बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची धांदल उडते. लग्नाचा मोसम असल्याने खासगी बसेसना मागणी वाढली असली तरी मार्गावरील वाहतूक सेवा वळवता येत नाही, हा कायदा लागू होत असतो. त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, खासगी बसमालक प्रवाशांना गृहीत धरून मनमानी कारभार करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी हरमलकर यांनी केली आहे.

म्हापसाहून सुटणाऱ्या बसेस तब्बल तास-दीड तासाने सुटत असल्याने प्रवाशांना बसायला जागा नसते व मुळात उभे राहून २५-३० किलोमीटर प्रवास करणे प्रवाशांना जीवावर असते. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेत, बसमालक जादा वेळ घेऊन बसेस सोडीत असल्याने प्रवाशांचा संताप अनावर होतो. निम्मे प्रवासी बसमध्ये उभे राहून प्रवास करीत असल्याने ‘हात ओले’ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अनिकेत पेडणेकर, विद्यार्थी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT