Kadamba Buses Dainik Gomantak
गोवा

कंदब महामंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या बसेसवर खाजगी बस मालकांनी घेतला आक्षेप

पत्रकार परिषदेत बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्‍हणकर (Sudip Tamthankar) यांनी सांगितले की कोरोनामुळे दिड वर्षे खाजगी बसेस बंद आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीमुळे (Covid 19) गेले दिड वर्षे खाजगी बसेस बंद आहेत. सर्व व्यवहार सुरु झाले तरी खाजगी बसेस (Private Buses) सुरु होत नसल्याने लोकांच्या मागणीनुसार कदंब महामंडळाने ज्या नव्या कदंब (Kadamba) बसेस सुरु केल्या आहेत त्यांना खाजगी बस मालक संघटनेने आक्षेप घेतला आहे. आज रायबंदर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्‍हणकर (Sudip Tamthankar) यांनी सांगितले की कोरोनामुळे दिड वर्षे खाजगी बसेस बंद आहेत.

त्या पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी किमान ५० हजार खर्च आहे. त्यामुळे काही खाजगी बसेस सुरु असल्या तरी बहुतांश बसेस बंद आहेत. त्यामुळे कदंबचे कर्मचारी आपापल्या गावातील नागरिकांची दिशाभूल करुन सह्या घेतात व सदर सह्या आमदारांना दाखवून नवी कदंब बस सुरु करण्यास सांगतात. या नव्या बसेस सुरु करण्यास आपला विरोध असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

अनुदान त्वरीत द्या

सरकारने खाजगी बसमालकांचे थकलेल इंधन अनुदान, नवी बस घेण्यासाठीचे अनुदान त्वरीत द्यावे. तसेच रस्ता कर भरण्यास मुदतवाढ द्यावी. या मागण्या घेऊन आपण मुख्यमंत्र्याना भेटलो आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाहतूक संचालक राजन सातार्डेकर हे चांगले काम करत नसल्याने त्यांची बदली करा. अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्याकडे केल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

कदंब ताब्यात द्या, फायद्यात आणून दखवतो!

कदंब महामंडळाला सरकार करोडो रुपये अनुदान देते. तरी कदंब महामंडळ नुकसानीत आहे. खाजगी बस मालकाकडे कदंबच्या बसेस चालवायला द्या. वर्षभरात कदंबला तोट्यातून फायद्यात आणून दाखवतो. असे आज ताम्हणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT