Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ब्रेक फेल झाल्यामुळे बसची अनेक वाहनांना धडक

जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला आहे. हातखंबा येथे बस उताराला असताना ब्रेक झाल्याने बसने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. रविवारी हा अपघात झाला.

या विचित्र अपघातात बसने एकूण सात वाहनांना धडक दिली. जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी, बसचालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अपघातात दुचाकीस्वार शग्गिर अजमिर अंसारी ( वय 33, रा. कोकण), महेश घोणपडे आणि जितेंद्रकुमार चौगुले (दोघेही रा. इचलकरंजी) जखमी झाले आहेत.

अपघातानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करण्यात आली, त्यामुळे वाहनांना वाट मोकळी झाली. दरम्यान, हातखंबा उतरावर यापूर्वी देखील अपघातांची नोंद झाली आहे.

बसचा ब्रेक झाल्यानंतर बस सुरूवातीला एका कारला धडकली, त्यानंतर दुचाकी व नंतर पुन्हा एका कारला धडकली. यात दुचाकीचे चक्काचूर झाला आहे.

बस हातखंबा उतराला लागल्यानंतर ब्रेक फेल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर बस रस्त्याकडेला असलेल्या वाहनांना धडकली. धडकेत बसचा चालक आत अडकून पडला, मात्र स्थानिकांनी तात्काळ त्याला बाहेर काढत किरकोळ जखम झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पुढे जाऊन बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या बँकेच्या जुन्या इमारतीवर धडकली आणि तिथे जाऊन थांबली. यामुळे मोठा पुढील अनर्थ टळला. पण, अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. बस हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT