Savitri Kavalekar: साळावली धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे. ज्या लोकांनी गोव्याची तहान भागविण्यासाठी आपला गाव पाण्याखाली घातला, त्या कुर्डीवासीयांना धरणाचे पाणी उघड्या डोळ्यांनी पाहता येते, पण पिण्यासाठी पाणी-पाणी करावे लागते. मग निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणता विकास केला म्हणून सांगेच्या जनतेने त्यांना या निवडणुकीत संधी द्यावी? याबाबत कुर्डीवासीयांनी या लोकप्रतिनिधींना अवश्य जाब विचारावा असे आवाहन सांगेच्या अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी वाडे-कुर्डी येथील कोपरा बैठकीत मतदारांना केले.
यावेळी व्यासपीठावर नवनाथ नाईक, चंदन उनंदकर, सगुण गावकर, उपसरपंच कुष्ठ गावकर, पंच जानू झोरे, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, चंद्रकांत गावकर व इतर उपस्थित होते. (Priority will be given to the problems of salaulim dam victims Savitri kavalekar)
पुढे बोलताना सावित्री म्हणाल्या की, हजार कोटींची कामे केली मग अजून सांगे टँकरमुक्त का झाला नाही? रोजगार नाही, नोकऱ्यांचा बाजार मांडलाय, कोविड काळात कोणी किती समाजसेवा केली हे सांगेवासीयांना (Sanguem Constituency) माहिती आहे. पण आपल्याला विश्वास आहे ज्यांना पाच वर्षे संधी देऊन काहीच केले नाही त्यांना सांगेतील जनता परत संधी देणार नाही. म्हणूनच येत्या निवडणुकीत ‘कपाट’ या निशाणीवर शिक्का मारून आपल्याला विजयी करा.
नगरसेवक मेशू डिकॉस्ता म्हणाले, ज्यांना संधीचे सोने करता आले नाही पण स्वतःसाठी सोने केले, त्या माजी लोकप्रतिनिधींना सांगेतील स्वाभिमानी जनता कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. जे लोक सावित्री कवळेकर यांना ‘बाहेरची’ म्हणून टीका करतात ते लोक कोविड काळात घरात बसून होते.
नवनाथ नाईक म्हणाले की, विकासाच्या बाता मारणाऱ्यांनी कोविड काळात जनतेला सामानाच्या पोटल्या का विकल्या? विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी जनता यावेळी फसणार नाही. दरम्यान, यावेळी चंदन उनंदकर, कुष्ठ गावकर, महेश गावकर यांनीही विचार मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.