Deepak Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दीपक ढवळीकरांचे लक्ष, भाजपची मोर्चेबांधणी; ‘प्रियोळ’मुळे युती तुटण्याची शक्यता?

Ponda Politics: फोंडा तालुक्यातील इतर तीन मतदारसंघाच्या मानाने प्रियोळ हा सर्वात कनिष्ठ मतदारसंघ. गोव्याला राज्य दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला.

Sameer Panditrao

फोंडा: फोंडा तालुक्यातील इतर तीन मतदारसंघाच्या मानाने प्रियोळ हा सर्वात कनिष्ठ मतदारसंघ. गोव्याला राज्य दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २०२२च्या निवडणुकीत केवळ २१३ मतांनी पराभूत झालेल्या दीपक ढवळीकर यांनी कंबर कसली आहे.

भाजपनेही पुन्हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजप मगो युती असल्याने हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला हे येणारा काळच ठरवेल एकंदर युतीचे भवितव्यही प्रियोळवर अवलंबून असल्याचा विश्‍लेषकांचा होरा आहे.

१९८९ साली झालेल्या निवडणुकीत ‘मगो’चे डॉ. काशिनाथ जल्मी हे या मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. १९९४ साली त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. मात्र १९९९ साली त्यांचा भाजपच्या ॲड. विश्वास सतरकर यांच्याकडून पराभव झाला. २००२ साली सतरकारांनी पुन्हा विजय प्राप्त केल्यानंतर २००७ साली त्याना ‘मगो’ चे दीपक ढवळीकर यांनी पराभूत केले.

ढवळीकर २०१७ पर्यंत प्रियोळचे आमदार राहिले. पण २०१ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या गोविंद गावडे यांनी दीपक यांचा जवळजवळ सात हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरलेल्या गावडेंनी दीपक ढवळीकर यांचा पराभव केला खरा, पण मताधिक्य मात्र घसरले. त्यांची यावेळी आघाडी होती फक्त २१३ मतांची.

आता यावेळी पुन्हा प्रियोळ मतदारसंघ चर्चेत आला असून या मतदारसंघावरच भाजप ‘मगो’ची युती अवलंबून असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर हे पुन्हा येथून आपले नशीब आजमावतील,अशी माहिती मिळाली आहे. मागे जरी त्यांनी आपण प्रियोळच नाही तर फोंडा, शिरोडा या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, असे सांगितले असले तरी तो रणनीतीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खरेच जर दीपक ढवळीकर या मतदारसंघातून उतरले तर त्यांची ही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची पाचवी खेप ठरू शकेल. परिणामी तिसऱ्या वेळी आमने सामने येणाऱ्या गोविंद- दीपक यांची लढत रंगतदार ठरू शकेल.

Ponda News

भाजपची मोर्चे बांधणी

भाजपनेही प्रियोळात मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून आमदार तथा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी म्हार्दोळ, माशेल भागात थाटलेल्या कार्यालयांद्वारा मतदाराशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय त्यांनी आगामी झेडपी निवडणुकीवरही लक्ष केंद्रित केल्याचे समजते.

दीपक यांच्याकरता ‘सेफ’?

मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर हे जरी फोंडा व शिरोडा मतदार संघ बाबत बोलत असले तरी त्यांच्या दृष्टीने प्रियोळ मतदारसंघ ‘सेफ’ मानला जात आहे. आता खरंच हा मतदारसंघ ‘सेफ’ आहे का, याचे उत्तर सहा महिन्यांनी होणाऱ्या झेडपी निवडणुकीनंतर मिळू शकेल.

प्रियोळचा इतिहास

प्रियोळ मतदार संघातून आतापर्यंत कोणताही आमदार दोन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेला नाही. आता या मतदारसंघातून सलगपणे दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार गोविंद गावडे आगामी निवडणुकीत हा ‘इतिहास’ बदलतात की राखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT