PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'गोवा दौरा'; कार्यक्रमाची रूपरेषा

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या निमित्ताने भाजपला अनुकूल असे वातावरण तयार करण्यात पक्षाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

मडगाव बसस्थानकावर उद्या (ता. 6) दुपारी 1 वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत विकसित भारत हा सरकारी कार्यक्रम होणार असला, तरी त्याला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी सर्वसामान्य मतदारांनाही आणावे यासाठी योग्य तो संदेश पोचविण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मडगाव परिसरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे सरकारी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. हे महाविद्यालयीन विद्यार्थी नवमतदार आहेत.

उद्‍घाटन होणारे प्रकल्प

  • कुंकळ्ळी येथील एनआयटी

  • करंझाळे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस

  • कुडचडे येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प

  • शेळपे, साळावली येथील जलप्रक्रिया प्रकल्प

  • कांपाल - पणजी ते रेईश मागूश दरम्यानच्या

  • ‘रोप-वे’ची पायाभरणी

पंतप्रधानांचा कार्यक्रम

  • सकाळी 9.50: दाबोळी विमानतळावर आगमन

  • सकाळी 10.15: बेतूलला आगमन

  • सकाळी 10.30 ते 10.40: एकात्मिक समुद्र अस्तित्व प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन

  • सकाळी 10.45 ते दु. 2 पर्यंत :‘भारत ऊर्जा सप्ताह - 2024 ’चे उद्‍घाटन

  • दुपारी 2.35: फातोर्डा साग मैदानावर आगमन

  • दुपारी 2.45: विकसित भारत कार्यक्रम स्थळी आगमन

  • दुपारी 2.45 ते 4: विकसित भारत सभा

  • संध्याकाळी 4.10: फातोर्ड्याहून दाभोळीला प्रयाण.

हेलिपॅडची व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दाबोळी विमानतळावरून हेलिकॉप्टरने बेतूल व नंतर बेतूलहून मडगावला येणार आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी फातोर्डा मैदानावर व बेतूल येथे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. आज तेथे हेलिकॉप्टर आणून चाचणीही घेण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT