Pm Narendra Modi On Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Narendra Modi : तरुणांचा आपल्या आध्यात्मिक परंपरांशी संबंध अधिक दृढ होईल: पंतप्रधान मोदी

शिवकालीन इतिहास असलेले श्री सप्तकोटीश्वर मंदिर

गोमन्तक डिजिटल टीम

Saptakoteshwar Temple :  नार्वे-डिचोली येथील नूतनीकरण केलेले सप्तकोटेश्वर मंदिर हे आपल्या तरुणांचा आपल्या आध्यात्मिक परंपरांशी संबंध अधिक दृढ करेल. त्यामुळे गोव्यातील पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या श्री सप्तकोटेश्वर नूतनीकृत मंदिराचे लोकार्पणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्री सप्तकोटेश्वर नूतनीकृत मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते

शिवरायांच्या वास्तव्याचा दाखला

'सप्तकोटेश्वर मंदिराच्या गर्मकुडीच्या द्वारावर छत्रपतींच्या पावलांच्या खुणा, गर्भकुडीकर असलेली राजदरबार सदृश्य मांडणी, या खुणा मंदिराचा छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केल्याची साक्ष देत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत इतिहासातील उल्लेखावरून आणिं तेथील गुंफा आणि अन्य इतिहासकालीन खाणाखुणांवरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे स्पष्ट झालेच आहे. पण या मंदिराचे विकसित काम करताना शिवरायांचे या देवस्थानात वास्तव्य होते. याचा दाखला देणाऱ्या काही अन्य गोष्टींचा उलगडा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT