पंतप्रधानाच्या स्वयंपूर्ण मित्राशी थेट संवाद कार्यक्रम संपन्न.  Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधान मोदींनी साधला गोव्यातील जनतेशी संवाद

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वयंपूर्ण गोवा (Goa) मोहिमेची दखल घेत आज स्वयंपुर्ण मित्राशी संवाद साधला व कृषि(Agriculture) , मासेमारी (Fishing) अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: 'आत्मनिर्भर भारत - स्वयंपूर्ण गोवा' या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आज राज्यातील स्वयंपूर्ण मित्रासह नगराध्यक्ष, सरपंच, पंच सदस्य तसेच अन्य जनतेशी संवाद साधला. यात वास्कोत मुरगाव नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी खास उपस्थिती लावली.

पंतप्रधानांच्या स्वयंपूर्ण मित्राशी संवादाचे थेट प्रक्षेपण (Live broadcast) दाखवण्याची सोय यावेळी जनता वाचनालयात तसेच पालिकेसमोर करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या या संवादाचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सकाळी 10.30 वाजल्यापासून गर्दी केली होती. सुमारे दीड तास हा कार्यक्रम झाला. यात पंतप्रधानांनी विविध स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधला व त्यांच्याकडून आत्मनिर्भरतेचे धडे घेतले व माहिती जाणून घेतली व त्यांना त्यांच्या कार्याबद्दल शाबासकी दिली.

या कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची दखल घेत आज स्वयंपुर्ण मित्राशी संवाद साधला व कृषि, बागायती, मासेमारी अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्याना त्यांनी यशाची पावती म्हणून त्यांचे अभिनंदन केले.

198 पंचायती व 14 पालिका मधून स्वयंपूर्ण नेमण्यात आले होते. 02 ऑक्टोबर 2020 पासून सदर मोहीम सुरू झाली असून तिच्या माध्यमातून सरकारने आपल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून अनेकांना त्याचा फायदा जनतेला मिळवून दिला आहे. त्यानुसार त्याचा आढावा पंतप्रधानांकडून घेऊन तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. त्यासाठी मी जनतेचा मनःपूर्वक आभारी असल्याचे ते शेवटी म्हणाले.

मुरगाव (Murgaon) नगरपालिकेत जनता वाचनालयात (Public Library) झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात यावेळी मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले, नगरसेवक दीपक नाईक, कृणाली मांद्रेकर, अमेय चोपडेकर, यतीन कामुर्लकर, प्रजय मयेकर, फेड्रीक हेन्रीकस, विनोद किनळेकर, दिलीप बोरकर तसेच शासकीय कर्मचारी (Government employees) व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT