Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मातृभाषेतूनच बौद्धिक विकास; गोविंद गावडे

सावईवेरे पंचक्रोशीत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Shreya Dewalkar

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांवर चांगले संस्कार होतात, शिवाय मुलांचा बौद्धिक विकासही उत्तम होतो. मुलांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावसायिक व निसर्गाचे ज्ञान आत्मसात करणेही गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच मुलांनी आपले आरोग्यही सुदृढ व सक्षम करण्यासाठी खेळालाही महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी सावईवेऱ्यात केले.

वेरे - वाघुर्मे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित सावईवेरे पंचक्रोशीतील सर्व सरकारी प्राथमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर गट विकास अधिकारी आश्विन देसाई, सरपंच शोभा पेरणी, उपसरपंच बाबू गावडे, पंच सदस्य स्वाती पालकर, लोचन नाईक, रोहन तारी, नवनाथ वेलकासकर, अक्षय नाईक उपस्थित होते.

शोभा पेरणी म्हणाल्या, मुलांवर चांगले संस्कार करणे, पालकांची तसेच शिक्षकांची जबाबदारी आहे. मुलांमध्ये वाचन व शिस्त लावावी.

सत्यवान शिलकर यांनी प्रास्ताविक केले. स. प्रा. वि. घाणो - सावई, स. प्रा. वि. भाटोळे - सावई, स. प्रा. वि. पाली, स. प्रा. वि. सडा - सावईवेरे, स. प्रा. वि. कावंगाळ व स. प्रा. वि. वाघुर्मे या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. मधलावाडा, वेलकास, वाघुर्मे, सावई या अंगणवाडी व बालवाडीतील मुलांना पंचायतीतर्फे खेळणी प्रदान करण्यात आली.

दहावीतील 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या भाविका खेडेकर, दुर्वा शेट वेरेकर, आचल गिरोडकर, विस्मया गावडे या चार विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सूत्रनिवेदन सत्यवान शिलकर यांनी केले तर उपसरपंच बाबू गावडे यांनी आभार मानले.

चरित्रांतून प्रेरणा घ्या!

मंत्री गावडे पुढे म्हणाले, मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद इत्यादी भारतीय महान व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा, त्यांचे चरित्र वाचावे. त्यांच्या चरित्रांतून प्रेरणा घ्यावी. त्यांचे कष्ट, परिश्रम आणि त्याग मोठा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT