Vegetables  Dainik Gomantak
गोवा

Vegetables In Goa: राज्यात भाज्यांचे दर समाधानकारक

Vegetables In Goa: चिबूड, काकडीला मागणी : मासळी खरेदीकडे नागरिकांचा भर

दैनिक गोमन्तक

Vegetables In Goa: राज्यात चतुर्थीपासून भाजीपाल्याचे दर समाधानकारक आहेत. राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येणाऱ्या चिबूड, काकडी, दोडकी, वाली तसेच इतर फळभाज्या, पालेभाज्या बाजारात दाखल होत असून त्यांना चांगली मागणीही आहे.

चिबूड आकाराप्रमाणे 70 ते 150 रुपये दराने विकले जात आहेत. काकडीलादेखील आकाराप्रमाणे दर मिळतोय. इतरही भाज्यांना चांगली मागणी आहे, असे विक्रेते सांगतात. चतुर्थीनंतर आता भाजीपाल्याबरोबर मासळी खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याने भाजीचे दर कमी आहेत. राज्यात पितृपक्षानिमित्त भाजीपाल्‍याला मोठी मागणी आहे.

ग्रामीण भागात पिकविलेल्या भाज्यांसह नीरफणस, भाजीची केळी, फागला आदींना जास्‍त पसंती दिली जाते. मध्यम आकाराचा नीरफणस 200 रुपये प्रतिनग तर भाजीचे एक केळे २० रुपये दराने विकले जात आहे.

सोबतच आंबाडे, कंदमुळे भाज्यांची मागणीही वाढली आहे. टोमॅटोचा दर आता स्थिर झाला असून ३० रुपये प्रतिकिलो दर आहे तर फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर त्‍याचा भाव १५ रुपये इतका आहे. बटाटे, कांदे तसेच इतर भाज्यांचे दरही स्थिर असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.

शहरांमध्‍ये रानभाज्यांना पसंती

गोव्‍याची राजधानी असलेल्‍या पणजी शहरात तायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत. त्यांना चांगली मागणीही आहे. ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरांत भाज्‍यांचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम जाणवत नाही. सध्‍या सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

फलोत्पादन महामंडळाचे भाज्यांचे दर

कांदा ------------------------- ३४

बटाटा -------------------------३०

टोमॅटो -------------------------१५

गाजर --------------------------३१

कोबी --------------------------२२

भेंडी --------------------------- ३५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT