President of India Droupadi Murmu goa visit Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रपती मुर्मू पुढील आठवड्यात 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, शपथ घेतल्यानंतरचा पहिलाच दौरा

तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती राज्यातील विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

Pramod Yadav

President of India Droupadi Murmu goa visit: देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू पुढील आठवड्यात तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू यांचा हा पहिलाच दौरा असेल. तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती राज्यातील विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढील आठवड्यात 22 ते 24 ऑगस्ट या तीन दिवसांसाठी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी चार वाजता त्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हजेरी लावून आमदरांना संबोधत करतील.

गेल्यावर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी त्या गोव्यात आल्या होत्या. यावेळी राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होते. दरम्यान, गोव्याचे अधिवेशन नुकतेच समाप्त झाले असून, पुढील आठवड्यात मुर्मू गोव्यात येत आहेत.

VVIP दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांच्या रजा रद्द

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोवा दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनातील आयएएस अधिकारी असलेले वेगवेगळ्या खात्यांचे सचिव, सर्व खातेप्रमुख तसेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी येत्या 24 पर्यंत रजा घेऊ नयेत असे निर्देश देणारे परिपत्रक कार्मिक खात्याने काढले आहेत.

तसेच, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे राज्यातील काही मार्गांवर वाहतूक निर्बंध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: BCCI चा मोठा निर्णय! जैसवाल, वॉशिंग्टनसह 5 जणांना झटका; दुबईला न नेण्याचा घेतला निर्णय

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Goa Live Updates: वास्कोत अपार्टमेंटच्या २ बाल्कनी कोसळल्या

SCROLL FOR NEXT