IPS Officer Dr. A. Koan Dainik Gomantak
गोवा

कळंगुटच्या पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अंदमान निकोबार येथे बदली

IPS Officer: गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिकारी ए कोन यांना निलंबित केले होते.

Pramod Yadav

गोव्यात पबमध्ये एका महिला पर्यटकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन रद्द केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 महिन्यांनंतर निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएस अधिकारी कोन यांची गोव्यातून अंदमान निकोबार येथे बदली करण्यात आली आहे.

डॉ. ए. कोन अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

गोवा पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे अहवाल दाखल केल्यानंतर गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिकारी ए कोन यांना निलंबित केले होते. उत्तर गोव्यातील बीच क्लबमध्ये एका महिला पर्यटकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप अधिकाऱ्यावर करण्यात आला होता.

अधिकारी कोन यांनी मद्यधुंद अवस्थेत क्लबमध्ये एका महिला पर्यटकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

काय आहे प्रकरण?

ऑगस्ट 2023 मध्ये, कोन उत्तर गोव्यातील पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट येथील नाईट क्लबमध्ये महिलासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. 7-8 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री, कोन लास ओलास बार आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिला पर्यटकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता, ज्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT