President Droupadi Murmu Goa Visit Dainik Gomantak
गोवा

President Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या गोवा दौऱ्यावेळी वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते असणार बंद

नद्यांमधील बार्ज, नौका यांच्या जलवाहतुकीवरही बंदी

Kavya Powar

President Murmu Goa Visit: 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोवा दौऱ्यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. राजधानी पणजीतील काही रास्ते यावेळी बंद असून मांडवी-झुआरी नद्यांमधील बार्ज, नौका यांच्या जलवाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

'हे' रस्ते असणार बंद...

  • NH 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा

  • NH 66 वेर्णा ते बांबोळी

  • गोवा मेडिकल कॉलेज ते दोना पावला

  • दोना पावला ते मिरामार

  • मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा

  • राजभवन ते बांबोळी

  • NH 66 बांबोळी ते पर्वरी

  • अटलसेतू

वरील मार्ग 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट यादरम्यान वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

माहितीनुसार, राष्ट्रपती या दौऱ्यात गोवा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच त्या राज्यातील आमदारांना देखील भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मांडवी-झुआरी नद्यांमधील बार्ज, नौकांवरही बंदी

या कालावधीत मांडवी आणि झुआरी नद्यांमधील बार्ज, नौकांवरही काही दिवस बंदी राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागाने तसे निर्देश दिले आहेत.

या निर्देशांमध्ये बार्ज आणि नौकांना निर्धारीत वेळेत मांडवी आणि झुआरीमध्ये काम करू नये, असे सांगितले आहे. यातून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या बार्ज, नौकांना वगळले आहे.

माहितीनुसार, 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत राजभवन आणि करंझाळे, दोना पावला परिसरात जलवाहतूक करता येणार नाही. तसेच 22 ऑगस्टला पाटो ते मिरामार परिसरात दुपारी 3 पासून संध्याकाळी 6 या वेळेत, तर 23 ऑगस्टला दुपारी 2 ते सायंकाळी 6 या काळात मिरामार ते रायबंदर या भागात जलवाहतूक न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT