President Election 2022 Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान; मोर्चेबांधणीला वेग

राष्ट्रपती निवडणूक: गोव्यातील दोन्ही गट सतर्क

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदासाठी उद्या रोजी निवडणूक होणार आहे. ही लढत सत्ताधारी ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट होणार आहे. निवडणुकीसाठी पर्वरी विधानसभा संकुलाच्या तळ मजल्यावर विशेष मतदान कक्ष उभारण्यात आला आहे. या निवडणूकीत राज्यातील आमदार, खासदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील 776 खासदार आणि देशभरातील सर्व विधानसभांचे 4033 आमदार असे एकूण 4809 मतदार उद्या मतदान करतील. राष्ट्रपती निवडणुकीत मतदारांच्या मताचे मूल्य लोकसंख्येच्या आधारे ठरते. या निवडणुकीसाठी 1971 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे.

यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, तेलंगण राष्ट्र समिती, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल यासारख्या पक्षांचा समावेश आहे. निवडणुकीत साठ टक्क्यांहून अधिक मतांची बेगमी केलेल्या द्रौपदी मुर्मू यांना आणखी वाढीव मते मिळवून देण्याची सत्ताधारी भाजपची रणनीती असल्याचे समजते.

40 आमदार करणार मतदान

पर्वरी विधानसभा संकुलात तळमजल्यावर लोकलेखा समिती (पीएसी) कक्षेजवळील रूम नंबर 12 मध्ये विशेष मतदार कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी पोलिस, विधानसभा सुरक्षा यंत्रणा व राखीव पोलीस दलाची सुरक्षा आहे. या ठिकाणी निवडणुकीत राज्यातील 40 आमदार भाग घेतील. राज्यातील 2 लोकसभा खासदार आणि 1 राज्यसभा खासदार हे दिल्लीत संसद भवनामध्ये मतदान करण्याची शक्यता आहे.

दोन्हीही गटांकडून मोर्चेबांधणी

क्रॉस मतदान होऊ नये सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत यासाठी पाच आमदारांना चेन्नईला हलवलेत. ते सकाळपर्यंत परततील. काँग्रेसचे इतर सहा आमदार राज्यातच असून त्यांची मते यूपीएच्या उमेदवाराला मिळणार नाहीत असे पक्षाने गृहीत धरले आहे. भाजपचे 20, मगो पक्षाचे 2 आणि 3 अपक्ष आमदार सकाळी हे विधानभवनात जाऊन मतदान करतील आणि नंतर विधानसभेच्या कामकाजात भाग घेतील,अ शी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

मुर्मू यांचे पारडे जड

सत्ताधारी ‘एनडीए’कडे एकूण 448 खासदार आणि 1773 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचे मूल्य 5,32,139 एवढे झाले असून द्रौपदी मुर्मू यांना विजयासाठी केवळ 11,077 मतांची आवश्यकता असताना एआयडीएमके, ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, तेलुगू देसम पक्ष, बहुजन समाज पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, शिरोमणी अकाली दलाने तसेच उत्तर प्रदेशातील सुहेलदेव पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्याकडील मते 61 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

Saptank Yog: शुक्र-शनीचा 'सप्तांक योग'! 24 एप्रिलपासून 'या' 3 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; गुंतवणुकीतून मिळणार छप्परफाड परतावा

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

SCROLL FOR NEXT