President Draupadi Murmu Dainik Gomantak
गोवा

President Draupadi Murmu: राष्ट्रपतींकडून आझाद मैदानावरील स्मारकाला भेट; हुतात्म्यांना आदरांजली

राष्ट्रपती मुर्मू या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.

दैनिक गोमन्तक

President Draupadi Murmu: गोवा दौऱ्यावर असलेल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (ता.२२) आझाद मैदान पणजी येथील हुतात्मा स्मरकावर पुष्पहार अर्पण करून गोव्याच्या हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती मुर्मू या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.

मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यात येताच, अगोदर राजधानी पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला भेट देत हुतात्मा स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी गोव्याच्या मुक्तिलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात,

भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर उपस्थित होते.

वाहतूक बंद

यावेळी, पोलिस पथकाने हुतात्मा चौकाच्या आजूबाजूला वाहतूक तात्पुरती बंद केली होती. परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवून काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी पोलिस करत होते. कार्यक्रमादरम्यान बँड पथकाने राष्ट्रपतींचे बँड वाजवत स्वागत केले. आदरांजली अर्पित केल्यानंतर बँडद्वारे राष्ट्रगीत वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Student Safety: शाळांजवळील अमलीपदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करा! आवदा व्हिएगस यांचे CM प्रमोद सावंतांना निवेदन

Horoscope: शुक्रवारी लक्ष्मीची विशेष कृपा! कुंभ, मीनसह 'या' राशींना आर्थिक लाभाचे संकेत; अडकलेली कामं मार्गी लागणार

Goa Accident: ऑईल गळतीमुळे भीषण अपघात! बसची पाच वाहनांना धडक, हमरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा

Goa land Sale Fraud: जमीन विक्रीच्या नावाखाली महिलेची 8 लाखांची फसवणूक; 30 लाख 40 हजारांचा व्यवहार, पोलिसांत गुन्हा दाखल

Sexual Assault Case: 13 वर्षांच्या लढाईनंतर पीडितेला अखेर न्याय! तरुण तेजपालला हायकोर्टाची कठोर शिक्षा; 10 वर्षांची सक्तमजुरी अन् 5 लाखांचा दंड देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT