Shirgao Villagers Demand Dainik Gomantak
गोवा

Shirgao: शेती, जलस्रोत वाचवा; 'खाण'प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरगावमधील ग्रामस्थांची मागणी

Shirgao Villagers Meeting: बांदेकर खाण सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिरगावातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

Sameer Panditrao

Shirgao Villagers Meeting At Bicholim

डिचोली: शेतीसह नैसर्गिक जलस्तोत्रांचे संवर्धन करा. स्थानिकांचा रोजगार आणि अन्य ज्वलंत प्रश्न सोडवा. तोपर्यंत खाणी सुरु करू नयेत, अशी मागणी खाणग्रस्त शिरगाव येथील नागरिकांनी सोमवारी येथे झालेल्या बैठकीत केली. खनिज डम्प, धोंड तळी, पाण्याची बिले आदी विषयांवर या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. गावाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक खनिज डम्प हटवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिरगाव ब्लॉक अंतर्गत येणारी बांदेकर खाण सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिरगावातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, संयुक्त मामलेदार अभिजित गावकर, खाण आणि भूगर्भ खात्याचे तसेच खाण कंपनीचे प्रतिनिधी, शिरगावचे सरपंच आणि अन्य पंचसदस्य उपस्थित होते.

वास्तविक एकाच खाण कंपनीपुरती ही बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र या बैठकीत शिरगाव भागातील साळगावकर आणि वेदांता खाणींचा मुद्दाही उपस्थित झाला. या बैठकीस उपस्थित असलेले खाण कंपनीचे प्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांबाबतीत अनुत्तरित राहिल्याने आमदार शेट यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय खाणी सुरु करू नका, असे स्पष्ट निर्देशही आमदारांनी यावेळी दिले.

शिरगाव गावाशी तीन खाणींचा संबंध येत असल्याने तिन्ही खाणींच्या लीजधारकांसमवेत बैठक घेण्याची मागणी लोकांनी लावून धरली. त्यामुळे खाण ब्लॉक-१, २ आणि ३ अंतर्गत येणाऱ्या खाणींच्या लीजधारकांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. पुढील आठवड्यापर्यंत बैठक निश्चित करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT