Premanand Naik Hunger Protest Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: माझ्याविरुद्ध षडयंत्र तरी उपोषण सुरूच राहणार! व्हिडीओ प्रकरणावरून नाईकांचे आरोप

Bhutani Infra Project Sancoale: जोपर्यंत सरकारने दिलेले भूतानी इन्फ्रा प्रकल्पाचे सर्व परवाने रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याचे प्रेमानंद नाईक यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Premanand Naik Fast Bhutani Infra Project Sancoale

वास्को: मी उपोषणाला बसल्यापासून सरकारच्या विविध विभागातून माझ्यावर उपोषण सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. तसेच प्रसारमाध्यमांवर जुना व्हिडिओ दाखवून माझे नाव बदनाम करण्याचे षड्‌यंत्र सांकवाळ पंचायतीच्या सत्ताधारी पंचसदस्यांसमवेत काही माजी पंचसदस्य करीत असल्याची माहिती प्रेमानंद नाईक यांनी दिली.

जोपर्यंत सरकारने दिलेले भूतानी इन्फ्रा प्रकल्पाचे सर्व परवाने रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याचे प्रेमानंद नाईक यांनी सांगितले. सांकवाळ-सावळफोंड गावात येणाऱ्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाविरोधात नाईक यांचा सोमवार (ता.२८) हा उपोषणाचा आठवा दिवस ठरला.

सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावळफोंड गावात प्रमेश कन्ट्रक्शनचा ‘भूतानी इन्फ्रा’ प्रकल्प उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प आल्यास याचा परिणाम संपूर्ण मुरगाव तालुक्याला भोगावा लागणार आहे. राज्य सरकारच्या शहर आणि नियोजन विभाग, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण व सांकवाळ पंचायतीमार्फत भूतानी इन्फ्रा प्रकल्प उभारण्यासाठी परवाने मंजूर केले आहेत.

या प्रकल्पाविषयी माहिती मिळताच स्थानिकांसमवेत कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला. त्यानंतर या प्रकल्पाला दिलेले सर्व परवाने रद्द करावेत या मागणीसाठी माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी सांकवाळ पंचायतीसमोर उपोषण सुरू केले.

चोवीस तास पोलिस बंदोबस्त

प्रेमानंद नाईक यांच्या उपोषणाचा सोमवार हा आठवा दिवस ठरला. त्यांना समर्थन देण्यासाठी सांकवाळवासीयांसमवेत गोव्यातील विविध भागांतील नागरिक येत आहेत. सोमवारी प्रेमानंद नाईक यांची कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी तपासणी केली. नाईक यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने डॉक्टर त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. तसेच उपोषणाच्या ठिकाणी चोवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT