Goa Assault Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गरोदर महिलेला लोखंडी सळ्या, धारदार शस्त्रांने मारहाण, नवराही गंभीर जखमी; 25 जणांच्या टोळक्याविरोधात तक्रार

Goa Crime News: २५ जणांचे टोळके हातात लाकडी दांडके, लोखंडी सळ्या, धारदार शस्त्रे घेऊन बस्तोडा जंक्शन येथे आले.

Pramod Yadav

हळदोणा: नास्नोळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला गंभीर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला गरोदर असताना देखील तिला गंभीर मारहण करण्यात आली. बस्तोडा जंक्शन येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. म्हापसा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विवेक आणि श्रुती शिरोडकर असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. दाम्पत्य शॉरमाची गाडी लावून व्यवसाय करतात. पार्किंगच्या किरकोळ कारणावरुन शिरोडकर दाम्पत्य आणि संशयितांमध्ये वाद झाला.

यावेळी संशयितांनी विवेक यांना धमकी दिली. यानंतर सायंकाळी शिरोडकरांनी शॉरमाची गाडी सुरु केली. यावेळी २५ जणांचे टोळके हातात लाकडी दांडके, लोखंडी सळ्या, धारदार शस्त्रे घेऊन बस्तोडा जंक्शन येथे आल्या.

संशयितांनी व्हॅनमधून विवेकला खाली ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर विवेकची पत्नी श्रुतीला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

शिरोडकर दाम्पत्याने म्हापसा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुढील वैद्यकीय तपासणी साठी दोघांना अझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हापसा पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

किरकोळ कारणावरुन झालेल्या या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. टोळक्याने अशा पद्धतीने केलेल्या मारहाणीचा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. गरोदर महिलेला देखील मारहाण केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT