Mumbai Goa Highway MSRTC Buses  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: खड्डेमय मुंबई-गोवा महामार्ग अन् गर्भवती महिलेला बसमध्येच सुरु झाल्या प्रसूती वेदना...

Mumbai Goa Highway: खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दयनीय आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दयनीय आहे. सध्या या महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.

पण, मुंबई-गोवा महामार्गावर रायगड येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या आणि बसच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरुप प्रसुती झाली. शनिवारी (दि.09) रायगडमधील कोलाड गावाजवळ घडली.

गर्भवती महिलेला बसमध्ये प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर बस चालकांनी तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु आहे त्याच भागात ही घटना घडली.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव संपेपर्यंत या मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे.

रुद्रोली गावात राहणाऱ्या सुशीला रवी पवार या दुपारी वडखळ येथे पनवेल-महाड बसमध्ये बसल्या. प्रवासादरम्यान त्यांना तीव्र प्रसूती वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे सहप्रवासी आणि बसमधील कर्मचाऱ्यांमध्ये तात्काळ त्यांची विचारपूस करुन, रुग्णालयात दाखल करण्याची गरज व्यक्त केली.

बसचालक देविदास जाधव आणि वाहक भगवान परब यांनी प्रसंगावधान दाखवत बस कोलाड येथील आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली.

सुशीला यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले आणि त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. सुशीला यांनी बसचालक आणि वाहक या दोघांचे आभार मानले आहेत.

आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर आई आणि बाळ दोघांनाही आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाली.

विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असून, आगामी गणेशोत्सव संपेपर्यंत या रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT