Train Canva
गोवा

संतापजनक! गोव्यात रेल्वे स्थानकावर महिलेस प्रसव वेदना; तास उलटूनही रुग्‍णवाहिकेचा पत्ता नाही, अखेर युवक धावला मदतीस

Chikhli Railway Station Goa: चिखली येथील रेल्‍वे स्थानकावर एका गर्भवतीला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिकेला ‘कॉल’ केल्यानंतरही ती वेळवर पोहचू न शकल्याने बाळाला स्थानकावरच जन्म देण्याची वेळ येते की काय, अशी स्‍थिती उद्‍भवली.

गोमन्तक डिजिटल टीम

Chikhli Railway Station Goa Pregnant Women Incident

मडगाव: चिखली येथील रेल्‍वे स्थानकावर एका गर्भवतीला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिकेला ‘कॉल’ केल्यानंतरही ती वेळवर पोहचू न शकल्याने बाळाला स्थानकावरच जन्म देण्याची वेळ येते की काय, अशी स्‍थिती उद्‍भवली. अखेर कमाल खान या युवकाने पुढाकार घेत तिला खासगी गाडीतून जिल्‍हा इस्‍पितळात नेले आणि तिने सुखरूपपणे बाळाला जन्मही दिला. या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या सुविधेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रुग्‍णवाहिका वेळेवर न पोचल्‍याने शिरीष काणे या मडगावच्‍या एका युवकाला प्राण गमवावा लागला होता. त्‍यानंतर संपूर्ण राज्‍यात मोठा गदारोळ होऊन आरोग्‍यमंत्री विश्वजीत राणे यांना त्‍याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात नव्‍या रुग्‍णवाहिका आणल्‍या जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे पुढे काय झाले त्‍याची अजून कुणालाच माहिती नाही.

कमालची ‘कमाल’; संस्थेकडून गौरव

कमाल ऊर्फ मुन्ना खान या युवकाचा ‘मडगावचा आवाज’ या संस्‍थेतर्फे ज्‍येष्‍ठ मठग्रामस्‍थ राधाकांत पै काणे यांनी सत्‍कार केला. यावेळी या संस्‍थेचे निमंत्रक प्रभव नायक हे उपस्‍थित होते. प्रभव नायक यांनीच यापूर्वी काणे मृत्‍यू प्रकरणी रुग्‍णवाहिकेच्या कमतरतेवर आवाज उठवला होता. एवढी मोठी घटना होऊनही आरोग्‍य खाते अजूनही सुस्‍त आहे, ही खेदाची गोष्‍ट असल्याची प्रतिक्रिया त्‍यांनी दिली. यासंबंधी प्रभव नायक म्हणाले, मडगाव इस्‍पितळातून रुग्‍णवाहिकेबाबत जो वेळकाढूपणा होतो तो एक दिवस रुग्‍णाच्‍या जिवावर बेतेल, अशी भीती आहे.

इस्‍पितळाजवळ रुग्‍णवाहिका होत्‍या;.. पण

चिखली येथे राहणारी मनिषा बिंद ही परप्रांतीय गर्भवती पतीबरोबर रेल्‍वेतून गावी जाणार होती. मात्र, तिला रेल्‍वे स्थानकावर प्रसूती कळा सुरू झाल्‍या. तिच्‍याबरोबर तिचा पतीही होता, त्‍याने रुग्‍णवाहिकेला फोन करून मदत मागितली. पण तास उलटूनही रुग्‍णवाहिका आली नाही. यावेळी मासेविक्रेता मुन्ना तिथे आला होता. तास उलटूनही रुग्‍णवाहिका न आल्‍याचे कळल्‍यावर त्‍याने रेल्‍वे स्‍टेशनबाहेर असलेल्‍या टॅक्‍सी चालकांना मदतीसाठी हाक दिली. पण अशा अवस्‍थेतील महिलेला गाडीत घेण्‍यासाठी कुणीच तयार होत नव्‍हते. शेवटी एक टॅक्‍सीचालक पुढे आला. त्‍याने तिला जिल्‍हा इस्‍पितळात आणले. मुन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्‍यावेळी ते इस्‍पितळात पोचले त्‍यावेळी इस्‍पितळाजवळ रुग्‍णवाहिका होत्‍या. असे असतानाही मडगाव रेल्‍वे स्‍थानकावर रुग्‍णवाहिका का आली नाही याचेच आश्चर्य वाटले, असे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT