Mapusa Market  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापसा मासळी मार्केटमध्ये गरोदर महिला पडून जखमी

Mapusa News: स्वच्छतेचा अभाव : जमीन निसरडी

दैनिक गोमन्तक

Mapusa News: म्हापसा येथील मासळी तसेच मटण मार्केट प्रकल्पामध्ये सध्या स्वच्छतेचा अभाव असून वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने येथील जमीन निसरडी बनली आहे. परिणामी, मार्केटच्या प्रवेशद्वारावर रविवारी एक गरोदर महिला घसरून जखमी होण्याची घटना घडली. त्यामुळे मार्केटच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा पालिकेकडून मासळी मार्केटची दररोज योग्यप्रकारे स्वच्छता होत नाही. तसेच या प्रकल्पाच्या पहिल्या मजला आणि जिने केरकचऱ्योन माखले आहेत. अनेक वर्षे हा मजल्याची साफसफाई झालेली नाही.

मासळी खरेदीसाठी येणारे अनेक खवय्ये या ठिकाणी घसरून पडण्याच्या अनेक घटना वारंवार घडल्या आहेत. याशिवाय मार्केटच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छतेअभावी गलिच्छ बनला आहे.

त्यातच रविवारी दि. 4 रोजी सकाळी महिला मार्केटच्या प्रवेशद्वारावर घसरून पडली व पायऱ्यांचे टाइल्स फुटून ती जखमी झाली. ही महिला गरोदर होती. लगेच तिला खासगी वाहनातून इस्पितळात नेण्यात आले व तिच्यावर उपचार करण्यात आले.

मासळी मार्केटमध्ये लोक अनेकदा घसरून पडतात. यामुळे मार्केटबाबत अपप्रचार होतो. यासाठी मार्केट प्रकल्पाची साफसफाई वेळेवर व्हावी, अशी मागणी आम्ही नेहमीच पालिकेकडे करत आलोय. गेल्या रविवारी एक गरोदर महिला घसरून पडण्याची घटना या ठिकाणी घडली. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेत मार्केटच्या स्वच्छतेवर देणे आवश्यक.
- शशिकला गोवेकर, मासळी विक्रेता संघटनेच्या अध्यक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT