Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: 'प्रतापसिंह राणेंमुळेच राज्याचा खरा विकास'! आरोग्यमंत्र्यांचे प्रतिपादन; वडीलांच्या आठवणी सांगताना झाले भावुक

Pratapsinh Rane: माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे सत्तरी तसेच राज्याचे खरे शिल्पकार असून त्यांच्यामुळेच राज्याचा खरा विकास साध्य झाला आहे असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले.

Sameer Panditrao

वाळपई: माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे सत्तरी तसेच राज्याचे खरे शिल्पकार असून त्यांच्यामुळेच राज्याचा खरा विकास साध्य झाला आहे. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करताना त्यांनी प्रत्येक नागरिकाचा विचार केला. आता त्यांच्या या वटवृक्षाला खतपाणी घालण्याचे कार्य आपणा सर्वांचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले.

म्हाऊस (सत्तरी) येथे नव्याने बांधलेल्या श्री रवळनाथ मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे व मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते फित कापून मंदिराचे भव्य उद्‍घाटन करण्यात आले.

मंदिरच्या सभागृह बांधकामासाठी तब्बल ७५ लाख रुपये खर्च झाला असून इतर कामांवरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. यावेळी जि.पं. सदस्य देवयानी गावस, सरपंच प्रिती गावकर, उपसरपंच राधिकी सावंत, पंच सोमनाथ काळे, गुरुदास गावस, देसाई, विनोद शिंदे, देवस्थानचे पुजारी रामा गावकर, भिको गावकर, समिती पदाधिकारी सुनिल म्हाऊसकर उपस्थित होते.

सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले. संजीवनी गिरोडकर हिने गणेश वंदना सादर केली तर अंकुश गावकर यांनी आभार मानले.

मंत्री राणे झाले भावुक

सत्तरीवासीयांचे प्रेम आणि वडील प्रतापसिंह राणे यांची आठवण सांगताना विश्‍वजीत राणेंना भावना अनावर झाल्या. ‘लहानपणापासून वडिलांसोबत राज्याच्या विकासाची प्रक्रिया जवळून पाहिली आहे. सत्तरीतील गरिबी, तेव्हाची बिकट स्थिती आणि त्यातून विकासाकडे झालेली वाटचाल माझ्या डोळ्यांसमोर आहे.’ असे सांगताना ते क्षणभर भावुक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Devarakonda: कोकणवासियांनो! विजय देवरकोंडा आलाय तुमच्या गावात, 'रावडी जनार्दन' कोकणच्या प्रेमात

Khawaja Asif: पाकड्यांची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळले; म्हणाले, "अल्लाह आमची मदत करेल" VIDEO

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरण, आरोपी जेनिटो कार्दोजचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ

"ही भारतातील सगळ्यात स्वच्छ जागा...",विदेशी पर्यटक दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यांवर फिदा; Video Viral

Kangana Ranaut: कंगना रनौतला मोठा झटका! 'शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकां'वरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चालणार देशद्रोहाचा खटला; आता कोर्टात होणार फैसला

SCROLL FOR NEXT