IFFI  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसार भारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Goa IFFI 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिक ज्या महोत्सवाची चातकासारखी वाट पाहतात तो इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या 20 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतोय.

Manish Jadhav

International Film Festival 2024 Live Stream Updates

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिक ज्या महोत्सवाची चातकासारखी वाट पाहतात तो इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या 20 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतोय. यंदाचा हा 55 वा चित्रपट महोत्सव 28 तारखेपर्यंत चालणार आहे.

तुम्हीही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर जरुर महोत्सवाला हजेरी लावा. परंतु तुम्हाला गोव्याला जाणं जमत नसेल तर नाराज होण्याची काही एक गरज नाहीये. महोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमींग होणार आहे. तुम्ही घरबसल्या प्रसार भारतीवर हा महोत्सव पाहू शकता.

एवढचं नाहीतर तुमच्यासाठी प्रसार भारतीने खास पेशकश केली आहे. प्रसार भारती नवीन प्लॅटफॉर्मसह ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी हे लॉन्च होणार आहे. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत हे विनामूल्य असणार आहे. यासंबंधीची माहिती बुधवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली.

जाजू यांनी हैदराबादमधील 16 व्या इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स (IGDC) मध्ये ही घोषणा केली, जिथे ते प्रसार भारतीच्या डिजिटल भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी मीडिया राऊंडटेबलमध्ये सहभागी झाले होते.

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 15 जागतिक, 40 आशियाई प्रीमियर तसेच106 भारतीय प्रीमियर्ससह 180 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जातील. यामध्ये जवळपास 81 देशांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

इफ्फीतील महत्वाच्या गोल्डन पीकॉक अवॉर्डसाठी 15 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फिक्शन फिचर फिल्म्स स्पर्धा करतील. यामध्ये 12 सिनेमे परदेशी आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, चीन या महत्वाच्या देशांमधील सिनेमे यात समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT