गोवा विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे, प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याच्या भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थितीत होते. (Pramod Sawant To Be Sworn In As Goa CM)
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार या कार्यकाळात निश्चित पूर्ण हे सरकार पूर्ण करणार आहे. खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकार (Government) प्रयत्न करणार आहे. तसेच रोजगार निर्मिती करून राज्यातील पर्यटनाला आणखी बळकटी देण्याची जनतेला हमी देत असल्याचे मत देखील यावेळी सावंत यांनी व्यक्त केले.
भाजपचा जाहीरनामा हा वचननामा आहे. जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने भाजप सरकार पूर्ण करेल आणि गोमंतकीय जनतेला दिलासा मिळवून देईल.
दरम्यान, गोव्यात (goa) डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह दहा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
मतदानानंतर, दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर अठराव्या दिवशी गोवा मंत्रिपदाच्या शपथविधी समारंभाचा समारोप झाला. राज्यपाल (governor) श्री पी एस श्रीधरन यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शपथ दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.