Pramod Sawant Takes Oath as CM of Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात डॉ. प्रमोद सावंतांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांचाही शपथविधी, ढवळीकरांसह अपक्षांचं नाव नाहीच

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. वाळपईचे आमदार विश्वजीत राणेंचं नाव या मंत्र्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले. पंतप्रधान मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिसाहातील पहिलीच वेळ मानली जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोहळ्याआधी शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली होती. या यादीत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नावाचा समावेश आहे. विश्वजीत राणेंना (Vishwajit Rane) दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकर यांचं आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसंच डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचं नाव शपथविधी घेणाऱ्या आमदारांच्या यादीतून गायब झालं आहे. या तिघांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु होती. सुदिन ढवळीकरांच्या नावाला अजूनही भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे कॅबिनेटच्या उरलेल्या जागांमध्ये या नावांना संधी मिळणार की भाजप (BJP) आणखी वेगळी खेळी खेळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे गोव्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही.

गोवा विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजपला 3 अपक्ष आमदारांसह मगोपनेही पाठिंबा दिल्याने भाजपचं संख्याबळ 25 वर पोहोचलं आहे. काँग्रेसचा गोव्यात विधानसभा निवडणुकीत सुपडासाफ झाल्याचं चित्र आहे. गोव्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्वच राज्यात एकाच वेळी शपथविधीचं भाजपचं नियोजन होतं. त्यामुळेच हा शपथविधी लांबला होता. गोव्यात शिगमोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शपथविधीला विलंब लागल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT