Vijay Sardesai Statement on Corruption  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विजय सरदेसाई यांचा भाजपविरोधात एल्गार

Vijay Sardesai on Goa BJP Government: गोव्यातील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांवरून विजय सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

Akshata Chhatre

पणजी: गोवा हे राज्य सर्वात लहान असलं तरी देखील दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण मात्र वाढत चाललंय. पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून गोव्यातील विविध भागांमधल्या सामान्य जनतेला फसवण्याचा प्रकार सुरु आहे. अँटी करप्शन डे (Anti Corruption Day) च्या निमित्तानेच गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडले आहे.

गोवा सरकार गुन्ह्यांवर पडदा टाकत असून सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत दररोज नवनवीन प्रकरणं उघडकीस येत आहे . पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचा प्रकार आता उघड झाला असला तरीही राज्य सरकार मात्र या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना वाचवण्याचा किंबहुना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

याच्या परिणामी देशासमोर गोव्याचं भलतंच चित्र उभं राहायला सुरुवात झालीये" असा उद्वेग सरदेसाईंनी एका इंग्रजी वृत्तपत्रासमोर व्यक्त केला.

"लोकशाहीचे चार स्तंभ असतात, त्यांना देखील भ्रष्टाचारामुळे अपयशाचा सामना करावा लागतोय, भाजपा सरकारच्या राज्यात प्रत्येक विभाग तडजोड करत वावरतोय आणि हे बरोबर नाही. भावी पिढीसाठी आणि गोव्याला समृद्ध आणि विकसित बनवण्यास गोमंतवासीयांनी एकत्र येण्याची गरज आहे" असं सरदेसाई म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT