PMAY Scheme Dainik Gomantak
गोवा

PMAY Scheme Goa: मोदींची डोक्यावर छत देणारी योजना गोव्यात बॅकफूटवर; आवास अंतर्गत दोन वर्षांत केवळ एकच घर

PMAY Goa housing status: केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची सोय करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे.

Sameer Amunekar

पणजी : केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही देशातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची सोय करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, गोव्यात या योजनेची अत्यंत संथ गती ही चिंतेची बाब आहे. मागील सहा वर्षांत २,६४३ घरं बांधण्यात आली, मात्र मागील वर्षभरात केवळ एकच घर उभारण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे याबाबत माहिती दिली आहे. गोव्यातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळण्यासाठी आणि योजना गतीमान करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

देशभरातील नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शहरी भागातील नागरिकांना घरबांधणीसाठी सबसिडीचा लाभ मिळतो.

दोन वर्षांत फक्त एकच घर

गोव्यात गेल्या सहा वर्षांत २,६४३ जणांनी या योजनेचा लाभ घेत घरं बांधली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत फक्त एकच घर बांधलं गेलं ही बाब चिंताजनक आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.

देशभरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि परवडणारे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही स्तरांवर सुरू केली. या योजनेंतर्गत लाखो नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

घरबांधणीच्या संख्येत मोठे चढ-उतार

गेल्या काही वर्षांत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत गोव्यात घरबांधणीच्या संख्येत मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. २०१९-२० मध्ये ४२५ घरे बांधली गेली, तर २०२०-२१ मध्ये हा आकडा वाढून १,५७७ पर्यंत पोहोचला. मात्र, पुढील वर्षांमध्ये ही गती मंदावली. २०२१-२२ मध्ये केवळ ३०९ घरे बांधली गेली, तर २०२२-२३ मध्ये ही संख्या ३३१ वर स्थिरावली.

विशेष म्हणजे, २०२३-२४ या संपूर्ण आर्थिक वर्षात एकही घर उभारण्यात आले नाही, ज्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. २०२४-२५ मध्ये स्थिती आणखी चिंताजनक असून, संपूर्ण वर्षभरात केवळ १ घर उभारण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT