Power Shutdown in Goa Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: राज्यात 'या' दिवशी वीजपुरवठा होणार खंडित

वीज खात्यातर्फे तातडीच्या दुरुस्ती कामासाठी 17 आणि 18 मे रोजी वीजपुरवठा केला जाणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Power Shutdown in Goa: वीज खात्यातर्फे तातडीच्या दुरुस्ती कामासाठी 17 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील 33 केव्ही ग्राहक, कळंगुटच्या काही भागात, साळगावच्या काही भागांत, गौरववाडो कळंगुट, हिल्टन हॉटेल, नेरूल, फट्टावाडो, धनाडी, भाटयेर, फिरगेभाट आणि भोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

तसेच 18 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पिळर्ण गाव, पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील काही भागांत, नौदल, व्हाळांत, बेती, वेरे आणि भोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

18 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आरोसी-पार्क हयात क्षेत्र, आरोसी बांद, सुखभाट, कोस्तावाडो, सीता हॉटेल बीच आणि पिदादवाडो, कांसावली-भुत्ते आणि प्रेयल भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

11 केव्ही लेखापरीक्षण भवन फिडरवर दुरुस्ती काम करायचे असल्याने 18 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत गौतम हॉटेल, पिकनिक प्लाझा, नवतारा हॉटेल, कामत नगर, टी. प्रकाश, सिद्धारूढ स्वामी मठ मंदिर आणि भोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

18 मे रोजी दु. 2 ते संध्या. 5.30 वाजेपर्यंत तीन बिल्डिंग, डेल्फिनोस, कांदोळी अर्बन, निशान सनी, साईबाबा मंदिर, गौरी पेट्रोल पंप, मोना नगर आणि देवश्री रिअल इस्टेट, अरोरा डेव्हलपर्स, सुपरएम बाय द वूड्स, कोर्ट यार्ड रेईस मागूस, होरायझन, देवश्री, दिनेश वर्मा आणि भोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

19 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत रेसिकॉम, झेवियर मिनेझिस, सॉलिटेअर डीटीसी, कॉस्मे कॉस्ता, नेक्सा शोरूम, झोडियाक पार्क, सबनीस पार्क, व्हिजन डेमो, गोवा स्कॅन सेंटर, चंद्रजीत हॉटेल, आरजी हॉस्पिटल आणि भोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT