Valpoi
Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi light : वीज बंच केबल सेवा कोलमडली ; नगरगाव ग्रामस्थ त्रस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Light :

वाळपई, सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागात विशेषकरून नगरगाव पंचायत भागातील अनेक गावांत वीज समस्या जटील बनली आहे.

वीज बंच केबल अगदी त्रासदायक ठरत आहेत. नगरगाव पंचायत भागातील गावांत वारंवार वीज गुल होत आहे. नगरगाव भागात वीज बंच केबल सेवेला अगदी ग्रहण लागले आहे.

नगरगाव पंचायत भागात धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, साट्रे, तार, माळोली आदी गावांत वीज समस्या जटीलच बनली आहे. वीज बंच केबल काय कामाच्या, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरगाव पंचायत भागातील लोक व्यक्त करीत आहेत. वीज खाते यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहे. नगरगाव-कोदाळ मार्गावरील आंब्याचे मळ, धावे या भागात वारंवार बंच केबल जळत असते. त्यामुळे बंच केबल चांगल्या प्रतीच्या घातलेल्या नाहीत, अशी टीका लोक करीत आहेत.

शहरात दोन मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तर लोकांना लगेच त्रास होऊ लागतो. त्यावेळी शहरात तत्काळ वीज दिली जाते; पण ग्रामीण भागात मात्र लोकांनी कितीही आवाज उठविला तर त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते, असे धावेचे नागरिक समीर केळकर यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारला जर वीज बंच केबलची समस्या सोडविण्यास जमत नसेल तर निदान पावसाळी हंगामात लोकांना मोफत केरोसीन तरी द्यावे, अशी मागणी लोक करीत आहेत.

दर्जाहीन वीज केबल

नगरगाव पंचायत भागात वीज बंच केबल ही चांगल्या दर्जाची नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो आहे. प्रत्येकवेळी बंच केबल जळतात. त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. सरकारी यंत्रणेचा काहीच ताळमेळ नसतो. एकदा बंच केबल दुरुस्ती केली की लगेचच पुन्हा नादुरुस्त होते. लोकांना मात्र याचा नाहक त्रास होतो, अशी माहिती धावेचे नागरिक समीर केळकर यांनी दिली.

नगरगावात वीज सुरळीत, पण.. !

नगरगाव पंचायत भागात विविध गावात शुक्रवार पासून विजेचा लपंडाव सुरू होता. धावे, आंब्याचे मळ आदी ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी जाऊन वीज दुरुस्तीचे काम केले व सोमवारी दुपारपासून नगरगाव पंचायत भागात वीज सुरळीत झाली. परंतु वीज बंच केबल याआधी अनेकदा नादुरुस्त होऊन त्या प्रत्येकवेळी दुरुस्त केली. पुढील काळात बंच केबल बिघडणार नाही, याची काळजी खात्याने घ्यावी,अशी मागणी नगरगाव ग्रामस्थांतून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT