Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News: सर्वत्र खड्डेच खड्डे; रस्ते विभागाकडून मलमपट्टीवर भर

Goa Roads: यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा व्यव‌स्थित होत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान येथील काही रस्ते खड्ड्यांत हरवले दिसत आहेत. आमदार कृष्णा साळकर यांनी याविषयी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडून खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे.

गेले १५ दिवस पावसाने थैमान घातले आहे. यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा व्यव‌स्थित होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. दरम्यान पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांचे हॉट मिक्स करून घेतले होते. त्यामुळे यंदा पावसात रस्त्यांची तितकी चाळण झाली नाही. किरकोळ अपवाद सोडला तर शहरात रस्ते अजून सुस्थितीत आहेत. फक्त स्वतंत्रपथ मार्गावरील काही भाग उखडलेला आहे.

विधानसभेत आवाज

गोवा शिपयार्ड समोरील रस्ता वारंवार खचत होता, यावर वारंवार तात्पुरती उपाययोजना करून हा रस्ता पुर्ववत करण्यात येत होता. आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला आज खडबडून जाग आल्याने भर पावसात यावर तात्पुरते आवरण ओढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT