Fishing In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: मान्‍सूनोत्तर पाऊस! यांत्रिकी बोटींना वरदान पण...

Goa Monsoon: ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेती लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, या पावसाचा लाभ मच्छीमारांना होत आहे. पारंपरिक मच्छीमारांपेक्षा जे यांत्रिकी बोटीने मच्छीमारी करतात त्यांच्यासाठी हा पाऊस वरदानच ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mechanized Fishing Gets a Boost from Post-Monsoon Showers In Goa

सासष्टी: ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेती लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, या पावसाचा लाभ मच्छीमारांना होत आहे. पारंपरिक मच्छीमारांपेक्षा जे यांत्रिकी बोटीने मच्छीमारी करतात त्यांच्यासाठी हा पाऊस वरदानच ठरत आहे. सध्या जोराने पाऊस पडतो खरा; पण समुद्रात त्याचा वारा किंवा समुद्र खवळण्यावर परिणाम झालेला नाही. त्यामुळे बोटी बिनधास्तपणे मच्छीमारी करू शकतात.

बोटमालक असलेले सावियो डिसिल्वा यांनी सांगितले की, पावसाचा काहीच परिणाम मच्छीमारीवर झालेला नाही. पावसामुळे समुद्रात मासळीची पैदास वाढलेली आहे. आम्हाला एका फेरीला तीन ते चार टन मासळी मिळते.

कुटबण मच्छीमार पतसंस्थेचे चेअरमन विनय तारी यांनी सांगितले की, पाऊस हा मच्छीमारीसाठी वरदान मानला जातो. सध्या आम्हाला भरपूर मासळी मिळत आहे. या दिवसांत जास्तीत जास्त प्रमाणात बांगडा जाळ्याला लागतो. मात्र, आम्हाला योग्य किंमत मिळत नाही. मडगावमधील मासळी मार्केटात आम्हाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नाही. हे मार्केट मध्यस्थांचे आहे. लोकांनाही फॉर्मेलिनयुक्त मासळी खाण्याची सवय जडली आहे. आम्ही संबंधित अधिकारिणीकडे तक्रारी केल्या, आमच्या समस्या मांडल्या; पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आमच्यापुढे एवढी मासळी इतरत्र देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.

पारंपरिक मच्छीमारीवर संकट!

पारंपरिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांच्या म्हणण्याप्रमाणे, आम्हाला मासळी मिळते; पण जेवढी मिळायला हवी तेवढी मिळत नाही. एरव्ही पावसाळ्यात आम्हाला मासळी जास्त मिळायला हवी होती. पण यांत्रिकी बोटींमुळे आम्ही कमी पडतो. हे बोटमालक आमच्यासारख्या पारंपरिक मच्छीमारांना जगू देत नाहीत. गोव्याच्या किनारपट्टीवर अडीच लाख पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यांचा उदरनिर्वाह हा एक मोठा प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT