Court Canva
गोवा

Porvorim Crime: स्कुटरमधून बियरची बाटली, चाकू काढून धमकावले; पोटावर केला वार; दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Porvorim Assault Case: न्यायालयाने या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२४, ५०६, ३०७ तसेच ३४ या गंभीर कलमांतर्गत खटला चालविण्यास पुरेसा पुरावा असल्याचे नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरी येथील सुकूर भागात २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी दिनेश मल्लीन्मणी (२८) आणि संतोष मल्लीन्मणी (३४) या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी दिले आहे. या आदेशामुळे दोन्ही भावांना खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.

न्यायालयाने या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२४, ५०६, ३०७ तसेच ३४ या गंभीर कलमांतर्गत खटला चालविण्यास पुरेसा पुरावा असल्याचे नमूद केले. ही घटना १७ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती.

तक्रारदाराला त्याचा मित्र संदीप आर्या याने फोन करून ‘माझ्यावर हल्ला झाला’ असे सांगितले होते. त्यानंतर तक्रारदार, त्याचा भाऊ सुरेश नाईक व इतर जण सुकूर येथील हिंदू स्मशानभूमीकडे गेले. तेथे त्यांना दोन्ही आरोपी भेटले व त्यानंतर त्यांना मारहाण झाली होती.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषने प्रथमच तक्रारदारांवर हल्ला केला. त्यानंतर त्याचा भाऊ दिनेश घटनास्थळी आला. दिनेशने आपल्या स्कूटरमधून बियरची बाटली व चाकू काढून पीडितांना धमकावले. दिनेशने चाकूने सुरेश नाईक याच्या पोटात वार केला व गंभीर रक्तस्त्राव करणारी दुखापत केली. संतोषनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हल्ल्यात साथ दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

अग्रलेख: ..दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा! दरोड्यांच्या मालिकेने 'गोव्याची शांतता' छिन्नविच्छिन्न केली आहे

SCROLL FOR NEXT