Porvorim Flyover Update
पणजी: पर्वरी येथील ओ कोकेरो येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खांबांचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असले तरी पर्यायी रस्त्यांवरील धोके अजून कायम आहेत.
याचिकादाराने केलेल्या सूचना तसेच पावसाळ्यापूर्वी पर्यायी रस्त्यांच्या सुरक्षितता व इतर खबरदारीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी संबंधित भागधारकांसमवेत पीडब्ल्यूडी प्रधान मुख्य अभियंता बैठक घेणार आहेत, अशी माहिती आज ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही सुनावणी पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली.
याचिकाकर्ता ॲड. मोसेस पिंटो यांनी जनहित याचिका सादर केली आहे. आज सुनावणीवेळी त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा पर्वरी येथे रस्त्यावर दुचाकी घसरून एका अवजड वाहनाच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी लोखंडी कमान उभारण्यात आल्या आहेत व त्याच्या खालून वाहतूक होत असल्याने ते धोकादायक बनले आहे. यासंदर्भातची काही छायाचित्रेही सूचनांसह पिंटो यांनी खंडपीठाला सादर केली. यावेळी खंडपीठाने त्यांना सूचनांबरोबर सुरक्षिततेसासाठी कर्तव्य बजावण्याचीही सूचना केली.
यावेळी सरकारच्यावतीने ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी याचिकादाराने अपघाताचा मांडलेला मुद्दा खोडून काढताना सांगितले की, हा अपघात दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळेच झाला आहे. या अपघाताचा बांधकामाशी काही संबंध नाही.
ज्या भागात उड्डाण पुलाचे खांब उभे राहिले आहेत तेथील रस्त्याच्या डागडुजी तसेच डांबरीकरण यासंदर्भात पुढील उपाययोजना ठरवण्यासाठी पीडब्ल्यूडी प्रधान मुख्य अभियंता सर्व भागधारकांशी चर्चा करणार आहेत. त्यानुसार सरकारला खबरदारी व उपाययोजनांची रुपरेषा तयार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.