Porvorim Dainik Gomantak
गोवा

Porvorim: चतुर्थीनंतर पर्वरीत वाहतूक मार्ग बदल, पांढऱ्या भुकटीचा त्रास असह्य; वाहनचालकांची तारांबळ

Porvorim flyover road closure: पर्वरी उड्डाणपुलासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यासाठी ‘ओ-कोकेरो चौक ते मॉल द गोवा’पर्यंतचा रस्‍ता आजपासून पाच महिने बंद राहणार होता.

Sameer Amunekar

पणजी: पर्वरी उड्डाणपुलासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यासाठी ‘ओ-कोकेरो चौक ते मॉल द गोवा’पर्यंतचा रस्‍ता आजपासून पाच महिने बंद राहणार होता; परंतु निर्णयात बदल झाला असून गणेश चतुर्थीनंतर तो बंद करण्‍यात येईल. त्‍यासंदर्भात नवी तारीख जाहीर करण्‍यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

नियमित मार्ग बंद केल्‍यानंतर प्रवाशांना बी. बी. बोरकर रस्तामार्गे शिवाजी जंक्शन (मॉल दि गोवा मागे) वाहतूक करावी लागणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्‍यानंतर पर्वरी परिसरात मार्गावर उडणारी पांढरी भुकटी प्रचंड धोकादायक ठरत आहे. रहिवाशांनी ओ-कोकेरो ते एससीईआरटी भागापर्यंतच्या रस्त्याला ‘गुदमरवणारे दुःस्वप्न’ असे संबोधायला सुरुवात केली आहे.

अनेकांनी या परिसराला ‘डेथ ट्रॅप’ अशीही उपमा दिली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मार्गावरून दुचाकी फेरी काढून मंत्र्यांनी दुचाकीवरून प्रवास करून पाहावा असे चक्क आव्हान देखील दिले आहे. एकूण ५.१५ कि.मी.च्या सहा लेनच्या या करिडॉर प्रकल्पाच्या कामामुळे वाहतुकीचा गोंधळ सुरुवातीपासूनच सुरू आहे. सध्या या प्रकल्पाचे केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे खात्याकडून सांगण्यात येते.

मे महिन्यात प्रीकास्ट सेगमेंट कोसळल्याची घटना घडल्याने प्रकल्प पूर्ण करण्यास एप्रिल २०२६ मधील मूळ मुदत वाढवून जून २०२६ करण्यात ०आली आहे. आता अंतिम मुदत ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC पाकिस्तान क्रिकेट टीमवर बंदी घालणार? दोन आठवड्यात होणार निर्णय, सोशल मीडियावर रंगली चर्चा

High Court: ‘कथित धर्मांतरणा’चा गुन्हा रद्द, पास्टर डोमिनिक आणि पत्नी जोनला हायकोर्टाचा मोठा दिलासा, याचिका काढली निकाली!

रामा यांच्या हल्ल्यामागे विद्यमान मंत्र्याचा हात? काँग्रेस आमदार फेरेरांचा संशय, 'गॉडफादर'चे नाव जाहीर करण्याचे पोलिसांना आवाहन

Borim Drugs Seized: बोरी येथे गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; 1.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shah Rukh Khan: किंग खानला मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, पत्नी गौरीची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ’

SCROLL FOR NEXT