Chandor:अंधारात हेल्मेट घालून येतो, महिलांचे ओढतो कपडे; चांदरच्‍या ‘त्‍या’ माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची मागणी

Chandor Crazy Man: वाटेत रस्त्यावर अंधार असल्याचा फायदा घेत दुचाकीवरून डोक्यावर हेल्मेट घालून आलेल्या एकाने या दोन महिलांच्या अंगावरील कपडे ओढले. त्यामुळे त्यांचा तोल गेला.
Crazy Man
Crazy Man Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दुचाकीवर असलेल्या दोन युवतींना खाली पाडून त्यांना जखमी करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. संशयित आरोपी माथेफिरूचा या प्रकरणात चोरीचा हेतू की विनयभंगाचा हेतू होता हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दोन महिला एका दुचाकीवरून चांदर मैदानाकडे जात होत्या. वाटेत रस्त्यावर अंधार असल्याचा फायदा घेत दुचाकीवरून डोक्यावर हेल्मेट घालून आलेल्या एकाने या दोन महिलांच्या अंगावरील कपडे ओढले. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि या दोन्ही महिला दुचाकीवरून पडता पडता बचावल्या.

Crazy Man
Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

त्यानंतर अवघ्या सुमारे १५ मिनिटांनी अशाच प्रकारची दुसरी घटना घडली. याच रस्त्यावरून आणखी एक दुचाकी येत होती आणि त्या दुचाकीवरही दोन युवती होत्या. त्याच अंधाराच्या जागी वरील संशयित आरोपीने या दुचाकीवर असलेल्या युवतीच्या कपड्यांना हात घालून त्यांनाही खेचले. परिणामी त्या दोन्ही युवती रस्त्यावर पडून जखमी झाल्या.

Crazy Man
Goa Crime: 'राज्यात गुन्‍हे कमी, चर्चा जास्त'! DGP आलोक कुमार यांचे निरीक्षण; गुन्‍हेगारीसंदर्भातील घटना Viral होत असल्याचा दावा

दरम्‍यान, या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटना पुन्‍हा होऊ नयेत याची काळजी घ्यावी. तसेच संशयित आरोपीला शोधण्यासाठी मायणा-कुडतरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com