Porvorim Flyover Construction  Dainik Gomatnak
गोवा

Porvorim: पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर! 94 % खांब उभारणी पूर्ण, उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावा

Porvorim Flyover: पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच दिलेल्या वेळेआधी उड्डाणपुलाचा लाभ नागरिकांना मिळणार असे दिसून येत आहे.

Sameer Panditrao

पणजी: पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच दिलेल्या वेळेआधी उड्डाणपुलाचा लाभ नागरिकांना मिळणार असे दिसून येत आहे. प्रकल्पाचे विविध टप्पे जवळपास पूर्णत्वास येत असून उर्वरित कामेही नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याने व्यक्त केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हालो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८८ खांबांपैकी ८२ खांब उभारण्यात आले आहेत, तर इतर सर्व कामे जलदगतीने सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण ५३० पाईल्सचे काम पूर्ण झाले असून, सर्व पाइल कॅप्सही (८८ पैकी ८८) पूर्ण झाल्या आहेत. एकूण ८८ खांब उड्डाणपुलासाठी उभारण्यात येणार असून सध्या ८२ खांब उभारून काम पूर्ण झाले आहे.

एकंदरीत खांब उभारणीचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ८८ पैकी ८२ खांब कॅप्सही पूर्णत्वास आल्या आहेत. सेगमेंट कास्टिंगच्या एकूण १४३१ भागांपैकी ३७६ सेगमेंट्सचे कास्टिंग पूर्ण झाले असून हे अंदाजे २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच एकूण ८७ स्पॅनपैकी १३ स्पॅन्सचे काम झाले असून सुमारे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

पूर्ण झालेले काम

पाईल्स – ५३० पैकी ५३० पूर्ण (१००%)

पाइल कॅप्स – ८८ पैकी ८८ पूर्ण (१००%)

खांब – ८८ पैकी ८२ पूर्ण (९४%)

खांब कॅप्स – ८८ पैकी ८२ पूर्ण (९४%)

सेगमेंट कास्टिंग – १४३१ पैकी ३७६ पूर्ण (२७%)

स्पॅन्स लॉन्चिंग – ८७ पैकी १३ पूर्ण (१५%)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT