Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Srinivas Naik Shooting: पर्वरी येथील ‘हॉटेल निओ मॅजेस्टिक’च्या लॉबीत उद्योगपती श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने तिघा संशयितांना अटक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी येथील ‘हॉटेल निओ मॅजेस्टिक’च्या लॉबीत उद्योगपती श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने तिघा संशयितांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात प्रत्यक्ष गोळीबार करणारे शार्पशूटर्स कोण आणि या प्रकरणाचा सूत्रधार कोण, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

मुंबई आणि उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या या तिघांचा या गोळीबार कटात सहभाग असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. काझू शेख (वय २८ वर्षे, रा. मुंबई), इसरार अली (वय २५ वर्षे, रा. उत्तर प्रदेश) आणि सूरज आचार्य (वय ३६ वर्षे, रा. मुंबई) अशी या संशयितांची नावे आहेत.

गुन्हे शाखेने काझू शेख याला उत्तर प्रदेशात जौनपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले, तर इसरार अली आणि सूरज आचार्य या दोघांना मुंबईतून ताब्यात घेतले. संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच या तिघांचा गोळीबारात थेट सहभाग, रेकी करणे, वाहनांची सोय करणे किंवा कट कारस्थानात सहभाग असल्याचे भक्कम पुरावे मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न गुन्हे शाखेकडून सुरू आहेत.

२८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर श्रीनिवास नायक यांच्यावर ३ ते ४ राऊंड गोळीबार करताना आणि त्यानंतर दुचाकीवरून हायवेच्या दिशेने पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसले होते. हे प्रत्यक्ष गोळीबार करणारे शूटर आणि सध्या ताब्यात घेतलेले तीन संशयित एकच आहेत, की या संशयितांनी केवळ पडद्यामागून मदत पुरविली याचा उलगडा होणे बाकी आहे.

पर्वरी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी केली होती. सध्या भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०९(१), १२५ आणि ३(५) तसेच आर्म्स ॲक्टनुसार तपास सुरू आहे. गुन्हे शाखेचे पथक या तीन संशयितांची कसून चौकशी करत असून, लवकरच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रत्यक्ष शूटर पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

व्यावसायिक वैमनस्य की अंडरवर्ल्ड कनेक्शन?

पोलिसांनी अटक केलेले हे संशयित केवळ मुंबई आणि यूपीमधील भाडोत्री गुंड/मदतनीस असू शकतात, असा संशय आहे. पण, हॉटेल निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार करण्यासाठी कोणी ‘सुपारी’ दिली होती? यामागे व्यावसायिक वैमनस्य आहे की अंडरवर्ल्ड कनेक्शन, याचा शोध घेणे हे पोलिसांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

काझू शेख याला ४ दिवस पोलिस कोठडी

याप्रकरणी पोलिसांनी आज संशयित काझू शेख याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT