Goa Bench of Mumbai High Court Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीज पत्नीला पतीच्या गोव्यातील संपत्तीवर हक्क सांगता येणार नाही! उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगाल वंशाच्या महिलेने गोव्यातील पुरुषाशी विवाह केला असला महिलेला नवऱ्याच्या वारसा हक्कात कोणताही अधिकार मिळणार नाहीत.

Kavya Powar

Portuguese wife cannot claim her husband's property in Goa

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगाल वंशाच्या महिलेने गोव्यातील पुरुषाशी विवाह केला असला तरी महिलेला नवऱ्याच्या वारसा हक्कात कोणताही अधिकार मिळणार नाहीत.

याबाबत एक प्रकरण समोर आले असून त्यासंबंधी उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ज्यामध्ये गोव्यातील एका पुरुषाने नंतर पोर्तुगीज नागरिकत्व पत्करले आणि त्या देशाच्या कायद्यानुसार पोर्तुगीज महिलेशी लग्न केले.

मात्र काही कालावधीनंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. ज्यावेळी महिलेने नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार सांगितला, तेव्हा कोर्टात याबाबत महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या. पोर्तुगीज नागरी संहिता, 1867 भारतीय वंशाच्या गोव्यातल्या नागरिकाला लागू आहे, असे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी सांगितले. मात्र महिला कधीही भारताची नागरिक नव्हती.

त्यामुळे न्यायालयाने नमूद केले की 1961 मध्ये गोव्याच्या मुक्ती लढ्यावेळी पोर्तुगीज नागरी संहिता, 1867 कायदा त्या पुरुषाला लागू होत होता. मात्र आता नाही. कारण तो मूळ गोव्याचा भारतीय नागरिक होता. दुसरीकडे, पोर्तुगालमध्ये जन्मलेली ती महिला नेहमीच पोर्तुगीज नागरिक राहिली आहे.

उच्च न्यायालयाने असेही नमूद केले आहे की, पोर्तुगालमध्ये 1966 मध्ये नवीन नागरी संहिता लागू करण्यात आली. मुक्ती संग्रामानंतर गोवा भारताचा भाग झाला. सध्याच्या प्रकरणातील दोन्ही पक्षांनी ही नवीन संहिता लागू झाल्यानंतर पोर्तुगालमध्ये विवाह केला होता.

त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. त्यामुळे महिलेला वारसा हक्क सांगता येणार नाही. दरम्यान, ही महिला कधीही भारतीय नागरिक नसल्यामुळे, उच्च न्यायालयाने सांगितले की, ती गोव्यातील नव्हे तर पोर्तुगालमधील कायद्यानुसार मालमत्तेच्या वैवाहिक नियमानुसार शासित आहे आणि त्यामुळे नवऱ्याच्या गोव्यातील संपत्तीवर महिला हक्क सांगू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: म्हापसा दरोड्यातील आरोपींनी पळवलेली कार पणजी पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळली

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT