Panjim Traffic Dainik Gomantak
गोवा

Pm Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौरा पार्श्वभूमीवर मांडवी अन् झुआरी जल वाहतुकीत मोठे बदल

बंदर कप्तान खात्याने दिली माहिती

दैनिक गोमंतक

गोवा राज्यात जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर असणार आहेत. यापार्श्वभूमीवर पणजी येथील मांडवी अन् झुआरी नदीतील जल वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती बंदर कप्तान खात्याने दिली आहे.

(Ports Department inform Mandovi and Zuari River at Panaji will not be navigable on 11th December)

बंदर कप्तान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी मांडवी पुलांच्या पश्चिम बाजूस मांडवी नदीमध्ये त्याचबरोबर झुआरी नदीमध्ये प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

घातलेल्या निर्बंधानुसार 11 डिसेंबर 2022 रोजी या नदीमध्ये प्रवास करणारी प्रवासी बोट, मासेमारी बोट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी नौका यांना नदीत प्रवेशाकरता निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेल्या जल वाहतुकीला हे नियम लागू नसतील. तसेच 12 डिसेंबर 2022 पासून ही वाहतुक सामान्यत: पुर्ववत असेल असे ही बंदर कप्तान खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT