POP Ganesh idol seizure Goa 
गोवा

पत्रादेवी नाक्यावर 'पीओपी' गणेशमूर्ती जप्त; मोपा पोलिसांची कारवाई, कोल्हापूरच्या एकास अटक

POP Ganesh Idol Illegal Transport: एमएच-०९-इएम-९३६६ या क्रमांकाच्या वाहनातून एकूण ५ गणेशमूर्तीची वाहतूक केली जात होती.

Pramod Yadav

पणजी: मोपा विमानतळ पोलिसांनी गोवा सीमेवरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (POP) बनविलेल्या गणेशमूर्तीची बेकायदा वाहतूक करणारे एक वाहन जप्त केले. ३१ जुलै २०२५ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी श्रीपाद नरेंद्र पाटील (वय २९ वर्षे, रा. जाधववाडी, जि. कोल्हापूर) या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली असून, संबंधित वाहन आणि मूर्ती जप्त केल्या आहेत. पुढील तपासणीसाठी मूर्तीचे नमुनेही घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-०९-इएम-९३६६ या क्रमांकाच्या वाहनातून एकूण ५ गणेशमूर्तीची वाहतूक केली जात होती. या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या असल्याने वाहतूक पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ च्या कलम १५(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, मोपा विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

Taliban Attack Video: लाँग रेंजवरुन अचूक निशाणा साधत केला खेळ खल्लास; 40 पाकिस्तानी जवान ठार; तालिबानी संघटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहा

katrina kaif Pregnant: "ही तर 2 वर्षांपासून गरोदर" विकी-कतरीनाची 'गुड न्यूज' चर्चेत, नोव्हेंबरमध्ये पाळणा हलणार?

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे झाले; 'जैश'च्या टॉप कमांडरने जाहीरपणे केलं मान्य Watch Video

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT