Bicholim Rotary Club Dainik Gomantak
गोवा

डिचोली रोटरी क्लबच्या पुढाकारातून सुर्लातील गरीब युवकाला मिळाले घर

रोटरी क्लबाच्या 117 व्या संस्थापक दिनाचे औचित्य साधून हे घर सच्चीत याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली रोटरी क्लबच्या पुढाकारातून जोशीभाट-सुर्ल येथील सच्चीत फोंडेकर या गरीब युवकाला निवारा मिळाला आहे. सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासत ''हावज टू होमलेस'' या उपक्रमांतर्गत रोटरी क्लबने सच्चीत फोंडेकर या गरीब युवकाला घर बांधून दिले आहे. रोटरी क्लबाच्या 117 व्या संस्थापक दिनाचे औचित्य साधून हे घर सच्चीत याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सुर्लचे पंच सुभाष फोंडेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

गौरीश धोंड यांच्या हस्ते सच्चीत फोंडेकर यांच्याकडे घराच्या चाव्या देण्यात आल्या. याप्रसंगी उपप्रांतपाल प्रिया नाईक, प्रतिमा धोंड, डिचोली रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदीन नायक, सचिव अमोल सावंत, सामाजिक सेवा संचालक सागर शेट्ये, उपाध्यक्ष संदेश बुर्ये, पारिश खानोलकर, आनंद देसाई, दुर्गेश कारापूरकर, डॉ. संदीप सावंत आदी पदाधिकाऱ्यांसह लाभार्थी सच्चीत फोंडेकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉडी कॅमेऱ्याशिवाय 'तालांव' फाडता येणार नाही; पोलिसांच्या गणवेशावर 'तिसरा डोळा', संवाद होणार कॅमेऱ्यात कैद!

Goa Live Updates: चिंबलमध्ये 'युनिटी मॉल'ला कडाडून विरोध

Saligao Theft: गोव्यात भरदिवसा चेन स्नॅचिंगचा थरार! सीसीटीव्हीत चोरट्याची करामत कैद; पोलिसांकडून शोध सुरु

रोषणाईने उजळले किनाऱ्यांचे गाव! गोव्यात नाताळचा जल्लोष; पाहा पणजीच्या 'इमॅक्युलेट'चर्चचा Video

Vijay Hazare Trophy: स्नेहलच्या शतकामुळे गोव्याचा विजय, छत्तीसगडला सहा विकेट राखून सहज नमविले

SCROLL FOR NEXT