Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण

Goa University: कुलसचिव म्हणतात, उत्तम जेवणास शुल्कवाढ हवी!

दैनिक गोमन्तक

Goa University: गोवा विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे जेवण पुरवायला हवे असेल तर विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ करावी लागणार असल्याचे कुलसचिवांनी सांगितल्याचा दावा ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केला आहे.

गोवा विद्यापीठातील वसतीगृहात मागील महिन्याभरापासून पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांत अळ्या आणि इतर तत्सम घटक आढळून येत आहेत. याबाबत ‘एनसयूआय’ने कुलसचिवांची भेट घेऊन निवेदन दिले होते.परंतु त्यांनी याबाबत कोणतीच कारवाई न केल्याने एनएसयूआयने आज शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

माध्यमांशी बोलताना नौशाद चौधरी म्हणाले, गोवा विद्यापीठात पेडणेपासून काणकोणपर्यंतचे राज्यातील विद्यार्थी आपले घर-दार सोडून शिक्षणासाठी विद्यापीठ वसतीगृहात राहतात. या विद्यार्थ्यांकडून अगोदरच वसतिगृहातील जेवणाचे शुल्क आकारले जाते. तरीही त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते.

या वसतीगृहामध्ये विविध देशातील विद्यार्थीही राहतात त्यांना देखील अशा निकृष्ट स्वरूपाचे जेवण दिल्याने विद्यापीठाची बदनामी होते. वारंवार विद्यापीठाच्या दर्जात घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण सचिवांनी आपण योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.

‘अभाविप’ने घेतली कुलसचिवांची भेट

वसतीगृहातील मेसमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात घट झाल्याच्या मुद्दावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उत्तर गोवा शिष्टमंडळाने कुलसचिवांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना वसतीगृहातील जेवणात झुरळे,अळ्या, सिमेंट, दगड, केस, आदी वारंवार सापडत असल्याने त्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली असता या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याचे ‘अभाविप’ सचिव सुदीप नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT