Mormugao Municipality  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिकेच्या बालोद्यानातील शौचालयांची दुरवस्था

बालोद्यानातील शौचालयांची दुरुस्ती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को: येथील मुरगाव पालिकेच्या बालोद्यानातील शौचालयांची दुरावस्था झाल्याने तेथे मुलांसह पालकांची कुचंबणा होत आहे. बालोद्यानातील शौचालयांची दुरुस्ती व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या शलाका कांबळी यांनी निवेदनाद्वारे पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. स्वातंत्र्यपथ मार्गाच्या एका बाजूला पालिका उद्यान तर दुसऱ्या बाजूला बालोद्यान आहे.

या दोन्ही उद्यानांची देखभाल मुरगाव पालिकेतर्फे करण्यात येते. बालोद्यानात शौचालये बांधण्यात आली होती. परंतु त्याची योग्य ती देखभाल न केल्याने दुर्दशा झाली आहे. काही वेळा काही जण लघुशंका करण्यासाठी तेथील आडोशाचा आसरा घेतात.

बालोद्यानात दुपारच्या वेळेला गर्दी कमी असते. अशावेळी काही युवक मौज-मजा करण्यासाठी बालोद्यानात येतात. त्यामुळे या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा बसवावेत, अशी मागणी शलाका कांबळी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Horoscope: करिअर, प्रेमात मिळणार यश! 'या' मूलांकांच्या व्यक्तींना 'सप्टेंबर' ठरणार भाग्यशाली

Goa Rain: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT