आसगाव येथे आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यासह पितापुत्राचे अपहरण केल्याप्रकरणी विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी काँग्रेस नेत्यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांसह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली तसेच, तिचा पती आयपीएस अधिकारी असून त्यांनीच गोवा पोलिस महासंचालकांना याप्रकरणी सूचना केल्याचे आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केला.
आसगाव घर मोडतोड प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर आरोप केले जात आहेत. याप्रकरणी पोलिस महासंचालक जसपाल सिंग संशयच्या भोवऱ्यात सापडले असून, या घटनेवरुन संचालकांनी कालपासून दोन स्पष्टीकरण दिले आहेत.
पूर्जा शर्माचा पती आयपीएस अधिकारी असून त्यानेच गोव्याच्या डिजीपींना कारावाईचे आदेश दिल्याचा आरोप अमित पाटकर यांनी केला होता. यावर DGP जसपाल सिंग यांनी पूजा शर्माचा पती IPS नसल्याचा खुलासा केला आहे. एक इंग्रजी वृत्तपत्रालातील बातमीचे कात्रण पोस्ट करत सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यासह "नागरिकांनी गोवा पोलिसांवर विश्वास ठेवावा. हणजूण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणी पोलिस काम करत आहेत. पोलिसांच्या टीम इतर शहरात देखील पाठविण्यात आल्या आहेत. प्रकरण योग्य निष्कर्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे ट्विट केले.
विरोधी पक्षातील नेत्यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन पोलिसांसह मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आरोप केले. तसेच, मुख्य संशयित पूजा शर्माच्या अटकेची मागणी केली.
त्याचदिवशी उशीरा रात्री मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल होत आगरवाडेकर यांची भेट घेऊन दोषींकडून घराचा खर्च वसूल केली जाईल तसेच कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.