Pooja Naik Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik Case: सागरचं खातं ‘नील’, पोलिस बुचकळ्यात; संशयित पूजा नाईकची दिवाळी कोठडीतच

Goa Job Scam: डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या पूजा नाईक हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. तथापि, या आदेशाला आव्हान देण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: उसगाव येथील एका महिलेला नोकरी देण्याच्या आमिषाने पंधरा लाख रुपयांना फसवलेल्या आयआरबी पोलिस सागर नाईक याला अखेर मंगळवारी उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, १५ लाख रुपयांना फसविल्याचा आरोप असलेल्या सागर नाईकच्या बँक खात्यात एकही पैसा नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात एका मुख्याध्यापिकेला अटक करून नंतर जामिनावर सोडले होते, तर अन्य एक महिला सध्या बेपत्ता असून तिचा शोध सध्या सुरू आहे. सागर नाईक याने १५ लाख रुपये स्वीकारले असल्याचा आरोप उसगावातील फसविल्या गेलेल्या महिलेने केला आहे. मात्र, बँक खात्यात त्याच्या नावावर एकही पैसा नसल्याने पोलिस बुचकळ्यात पडले आहेत.

पूजाला पाच दिवसांचा रिमांड

डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या पूजा नाईक हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. तथापि, या आदेशाला आव्हान देण्यात येणार आहे, असे पूजाच्या वकिलांनी सांगितले. ‘शिपाई’ पदाच्या नोकरी देण्याचे आमिष दाखवून पूजाने २ लाखांना गंडा घातला, अशी तक्रार डिचोली पोलिसांत केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

FC Goa: आज मोठी लढत! एफसी गोवा आणि पंजाब भिडणार

Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला

Goa Crime: संशयित कॉन्स्टेबलचा भाऊ अजूनही फरार! दोघी बहिणींना न्यायालयीन कोठडी; 'तो' दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT