Goa Carnival Festival Latest News Updates | Goa Carnival painting competition News Dainik Gomantak
गोवा

मडगाव कार्निव्हल चित्ररथ स्पर्धेत फोंड्याचा ‘जी बॉईज’ प्रथम

सर्व स्पर्धांचा निकाल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस यांनी जाहीर केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिका व गोवा पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने मडगावात आयोजित तीन दिवशीय कार्निव्हलमध्ये चित्ररथ मिरवणुकीतील पहिले बक्षीस फोंड्यातील जी बॉईजच्या वन्य जीवन वाचवा हा संदेश देणाऱ्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.या सर्व स्पर्धांचा निकाल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस यांनी जाहीर केला.

स्पर्धेचे दुसरे बक्षीस तमेश व ग्रुपच्या आर्मी हॅलिकॉप्टरला प्राप्त झाले. तिसऱ्या बक्षिसासाठी बिग सिटी रोझच्या प्रोटेक्ट गोवा ब्युटी चित्ररथाची निवड झाली. चौथे बक्षीस बॉईज ऑफ कुळे तर पाचवे बक्षिस युनियन बॉईजच्या चित्ररथाला मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस मालपो 1 डॅड झोंबी फार्मर्स यांना मिळाले. (Goa Carnival Festival Latest News Updates)

कचरा वर्गीकरण स्पर्धा: अनुक्रमे दामोदर फडते, आके बॉईज, जुवांव मिनेझीस यांना पहिली तीन बक्षिसे तर चौथे वेडिंग डे, पाचवे जॉली फॅमिली व उत्तेजनार्थ - मडगाव बॉईज, चांदर बॉईज व व्हिवा मडगाव यांना प्राप्त झाली.

क्लॉन स्पर्धेतः अनुक्रमे सदानंद गावणकर, रामचंद्र गावणकर, ब्लाझिया रिबेलो, रामा नाटेकर, पाचवे- डायलन रॉड्रिग्स, उत्तेजनार्थ - ग्लीन्सन फर्नांडिस, सांचो फर्नांडिस, कायतान फर्नांडिस, सानितीस रिबेलो.

क्लब व संस्था अनुक्रमे: खेम बॉईज,777 बॉईज, मिनिवन्स मायणा, आयकॉनीक बॉईज , शिव साई बॉईज, उत्तेजनार्थ - जॉसेफ रॉड्रिग्स, सेट जेरम बॉईज, अचानक युथ क्लब, ग्रॅंड ब़ॉईज बानावली, बॉईज ऑफ इल्हा द राशोल

पारंपरिक अनुक्रमे: गोंयचो लाकडाचो उद्योग,सांतिस्तेव्ह काजुच्या बियांचो कारखानो, आदले शेतकार, गोंयचे कुंभार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT