Ponda’s first sewage treatment plant at Kapileshwari nears completion  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यातील 'हा' महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण

नेटवर्कचे फक्त 2% काम बाकी

दैनिक गोमन्तक

फोंडा : कामाला होणारा विलंब आणि स्थानिकांच्या विरोधानंतर, फोंड्याच्या बाहेरील कपिलेश्वरी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) जवळजवळ पूर्ण होत आहे. चाचणीसाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वायरिंगचे काम पूर्ण झाले असताना, नेटवर्कचे फक्त 2% काम बाकी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रलंबित काम एप्रिलच्या मध्यापर्यंत पूर्ण केले जाईल तर चाचण्यांसाठी सांडपाण्याचा वापर केला जात नसल्याने पाइपलाइनशिवाय चाचण्या घेतल्या जाऊ शकतात.

सीवेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड (SIDCGL) चे उपव्यवस्थापक प्रदिप गौडे म्हणाले, “चाचण्या घेतल्या जात आहेत. 2020 च्या सुरुवातीस, मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत यांनी घोषणा केली होती की हा प्रकल्प 2020 च्या मध्यापर्यंत कार्यान्वित केला जाऊ शकतो. परंतु, साथीच्या रोगामुळे कामास विलंब झाला आहे. तब्बल 23 महिन्यांच्या विलंबानंतर जानेवारी 2018 मध्ये काम सुरू करण्यात आले. प्लांटमुळे फोंडा (Ponda) नाल्यातील प्रदूषण कमी होणार आहे. नाला सध्या धोक्यात आला आहे कारण आजूबाजूच्या घरातील घरगुती कचऱ्याने तो धोकादायकरित्या दूषित झाला आहे. “प्रकल्प (project) संपूर्ण फोंडा नगरपालिका (Municipality) क्षेत्र भागातून शौचालयातील सांडपाणी आणि घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया करेल, अशी माहिती गौडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT