फोंडा: सैन्य दलात जाणे म्हणजे कुटुंबापासून ताटातूट, त्यातच फिरतीचे जीणे, घरापासून दूर, धोकादायक स्थिती असा काहीसा समज गोव्यात असल्यामुळे बहुतांश पालक आपल्या मुलांना सैन्यात जाण्यापासून रोखतात, त्यामुळे बऱ्याचदा इच्छा असूनही अनेक मुलांना इतर क्षेत्रात जावे लागते.
पण फोंड्यातील कोलवेकर कुटुंबाने आपल्या मुलाला देशाच्या सेवेसाठी सैन्य दलात पाठवले. तेजस नितीन कोलवेकर याची सैन्य दलात ‘व्हेटरीनरी‘ विभागात कॅप्टन पदावर प्रथम दर्जाचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तेजस याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या आपला मुलगा तेजसबद्दल फार मोठा अभिमान वाटत असल्याचे त्याचे वडील नितीन कोलवेकर आणि आई निकिता कोलवेकर यांनी सांगितले. तेजसला लहानपणापासून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती, ही इच्छा त्याच्या आईवडिलांनी जपली आणि त्याला प्रोत्साहन दिले. तेजस सैन्यात व्हेटरीनरी डॉक्टर म्हणून कार्यरत झाला असून सध्या त्याची नियुक्ती उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे झाली आहे.
घरात सुसंस्कृत वातावरण असल्यावर मुलांवर चांगले संस्कार होता, त्याचाच हा परिपाक आहे. तेजसची बहीण तरल ही उच्च शिक्षित आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्याचा आमचा मानस होता, असे नितीन कोलवेकर यांनी सांगितले.
तेजसचे खडतर प्रयत्न आणि मेहनतच त्याला या पदापर्यंत घेऊन जाऊ शकली, असे ते म्हणाले. तेजस याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, गुरुजन आणि इतर सर्व मार्गदर्शकांना दिले असून आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादन करू शकलो, असे त्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.