इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Rajeev Shukla Gifts Book To King Charles: आजपासून बरोबर एका महिन्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल.
Rajeev Shukla Gifts Book To King Charles
Rajeev Shukla Gifts Book To King Charles@ShuklaRajiv
Published on
Updated on

Rajeev Shukla Gifts Book To King Charles: आजपासून बरोबर एका महिन्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. 1947 मध्ये याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले होते. योगायोगाने, इंग्लंडच्या भूमीवर पुन्हा एकदा 1947 च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लिश भूमीवर आपल्या कामगिरीने चांगलीच प्रशंसा मिळवत आहे.

लॉर्ड्समधील लढत आणि किंग चार्ल्सची भेट

लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असला, तरी गिल सेनेने इंग्लंडला (England) कडवी झुंज दिली. संघाच्या या कामगिरीने प्रभावित होऊन ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला भेटीसाठी बोलावले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ किंग चार्ल्स यांना भेटायला पोहोचला. या खास प्रसंगी राजीव शुक्ला यांनी किंग चार्ल्स यांना आपले एक पुस्तक भेट देऊन 1947 च्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या.

Rajeev Shukla Gifts Book To King Charles
India Test Team: चाहत्यांचा भ्रम ठरला फोल, 'रोहित-विराट' नसतानाही टीम इंडिया सुस्साट…युवा ब्रिगेड जबरदस्त फाॅर्ममध्ये

लंडनमध्ये ताज्या झाल्या 1947 च्या आठवणी

किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या खास भेटीदरम्यान, राजीव शुक्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित त्यांचे "स्कार्स ऑफ 1947" (Scars of 1947) हे पुस्तक भेट दिले. बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्षांनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. किंग चार्ल्स या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते, असेही त्यांनी ट्विट करुन सांगितले. भारतीय संघातील खेळाडूंनीही किंग चार्ल्स यांची भेट घेतली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rajeev Shukla Gifts Book To King Charles
Team India Test squad: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'हे' खेळाडू इंग्रजांना देणार टक्कर; कर्णधार कोण?

लॉर्ड्समध्ये भारताचा पराभव

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराह आणि त्यानंतर मोहम्मद सिराज यांच्या साथीने शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र, अखेरीस विजय इंग्लंडच्या हाती लागला. जडेजाने 181 चेंडूंचा सामना करत 61 धावांवर नाबाद राहिला. त्याने बुमराह-सिराजसोबत मिळून एकूण 212 चेंडू खेळले. विजयाच्या आणि इंग्लंडच्या मध्ये जडेजा खूप वेळ छाती काढून उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने जडेजा संघाचा पराभव टाळू शकला नाही. लॉर्ड्समधील विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com